chandrayaan 3 landing isro three biggest challenges of soft landing for chandrayaan
चंद्रावर भारत जिंकणार! चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 'ही' मोठी आव्हाने असणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 8:49 AM1 / 15आजचा दिवस भारतीयांसाठी महत्वाचा असणार आहे. चंद्रयान-3 चे लँडर आज सायंकाळी ५:४५ वाजता चंद्राच्या दिशेने जाण्यास सुरुवात करेल आणि ६: ०४ वाजता इस्रो त्याचे सॉफ्ट लँडिंग करेल.2 / 15चंद्रयान-३ च्या लँडर विक्रमचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास रोव्हर प्रज्ञान त्यातून बाहेर पडून चंद्रावर चालेल आणि तेथील पाणी आणि वातावरणाची माहिती देईल. पाणी किंवा बर्फाव्यतिरिक्त, इतर अनेक नैसर्गिक संसाधने देखील चंद्रावर आढळू शकतात.3 / 15पण, चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची अनेक आव्हाने आहेत. सुरक्षित लँडिंगसाठी भक्कम व्यवस्था असल्याचा दावा इस्रोने केला आहे. चंद्रयान-3 नंतर सुमारे एक महिन्यानंतर रशियाचे लुना-25 चंद्रावर क्रॅश झाले.4 / 15तब्बल ४७ वर्षांनंतर चंद्रावर मोहीम गेल्याने केवळ रशियाच नाही तर संपूर्ण जगाच्या वैज्ञानिकांना धक्का बसला. लुना-25 लाँच केल्याबद्दल इस्रोने रशियाचे अभिनंदनही केले आहे. भारताचे चंद्रयान 3 पुढील चाचणी देणार आहे. या शर्यतीत आता फक्त भारत उरला असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात कोणत्याही देशाला यश आलेले नाही, त्यामुळे भारतासमोर हे मोठे आव्हान आहे.5 / 15चंद्रयान 3 साठी तीन महत्त्वाची आव्हाने आहेत. यात पहिले आव्हान म्हणजे लँडरचा वेग नियंत्रित करणे. मागच्या वेळी लँडरचा वेग जास्त असल्याने अपघात झाला होता. 6 / 15याशिवाय लँडर चंद्रयान-3 साठी दुसरे आव्हान म्हणजे लँडिंग करताना लँडर सरळ राहिले पाहिजे. त्याच वेळी, लँडरसाठी तिसरे आव्हान आहे ते त्याच ठिकाणी उतरवणे, ज्याची इस्रोने निवड केली आहे.7 / 15मागच्यावेळी चंद्रयान-2 खडबडीत जागी आदळल्यामुळे क्रॅश झाले होते. चंद्रयान-3 लाइव्ह ट्रॅकर इस्रो चंद्रयान-3 चा वेग आणि दिशेवर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी लाईव्ह ट्रॅकरही सुरू करण्यात आला आहे. या लाइव्ह ट्रॅकरद्वारे, चंद्रयान-3 सध्या अंतराळात कुठे आहे ते पाहू शकतो.8 / 15रशियाचे लुना-25 का कोसळले? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, लुना-25 चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेत नेले जाणार होते, पण ते अनियंत्रितपणे त्या कक्षेबाहेर गेले.9 / 15रशियन एजन्सी Roscosmos च्या कॉम्प्युटरमध्ये चूक झाली होती, यामुळे Luna 25 शी संपर्क तुटला होता आणि २०१९ मध्ये भारताचे चंद्रयान-2 जसे क्रॅश झाले होते त्याच प्रकारे ते क्रॅश झाले होते.10 / 15लुना-25 क्रॅश झाल्यानंतर रशियाच्या स्पेस एजन्सीने एक निवेदन जारी केले, यात लँडर चुकीच्या कक्षेत गेला आणि नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर ते क्रॅश झाले, असं या निवेदनात म्हटले आहे.11 / 15अमेरिका, रशिया, चीन सुद्धा आपले अंतराळ यान दक्षिण ध्रुवावर उतरवू शकले नाहीत, जर इस्रोने लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रावर उतरवले तर भारत इतिहास रचेल. अमेरिका, रशिया, चीनचे शास्त्रज्ञही त्यांचे अंतराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवू शकले नाहीत, यामध्ये खडक आणि खंदक आहेत.12 / 15लँडर विक्रमचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास, रोव्हर प्रज्ञान त्यातून बाहेर पडेल आणि ५०० मीटरपर्यंतच्या परिसरात फिरेल आणि तेथील पाणी आणि वातावरण याबद्दल इस्रोला माहिती देईल.13 / 15लँडर विक्रम आज लँडिंगसह आपले काम सुरू करेल. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. यामुळे चंद्रयान-3 मोहीम १४ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करणार आहे.14 / 15चंद्रयान-3 लँडिंग लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची सुविधा केला आहे यासाठी चंद्रयान-3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.२७ वाजता सुरू होईल. हे इस्रोच्या संकेतस्थळावर पाहता येईल.15 / 15इस्रोच्या वेबसाइटवर isro.gov.in, YouTube वर... youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss, Facebook वर... Facebook https://facebook.com/ इस्रो किंवा मग ते डीडी नॅशनल टीव्ही चॅनलवर पाहता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications