शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chandrayaan 3 : चंद्रयान 3 उद्या मोठी झेप घेणार! उद्या चंद्राच्या जवळ जाणार; जाणून घ्या मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 3:34 PM

1 / 11
देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावरुन १४ जुलै रोजी लाँच झाले.
2 / 11
चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर जगभरातून भारताला शुभेच्छा दिल्या जात आहेत. जपान, ब्रिटनसह चीनच्याही अंतराळ संस्थेने भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.
3 / 11
इस्रोच्या म्हणण्यानुसार, चंद्रयान-3 आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचले आहे. हे सध्या 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरत आहे.
4 / 11
14 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 ते 12.30 दरम्यान चंद्रयान-3 चंद्राच्या खालच्या कक्षेत पाठवले जाईल. यासाठी बेंगळुरूमध्ये बसलेले इस्रोचे शास्त्रज्ञ काम करणार आहेत.
5 / 11
भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले, जे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.
6 / 11
चंद्रयान-३ ला पृथ्वी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घ्यायचा आहे. त्यातून तो खूपच कमी इंधनावर प्रवास करेल.
7 / 11
आतापर्यंत फक्त तीन देश चंद्रावर यशस्वीरित्या उतरू शकले आहेत. सोव्हिएत युनियन, युनायटेड स्टेट्स आणि चीन. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सर्वप्रथम उतरण्याचे भारत आणि रशियाचे लक्ष्य आहे.
8 / 11
रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने सांगितले की, त्यांच्या Luna-25 यानाला चंद्रावर जाण्यासाठी पाच दिवस लागतील. Luna-25 नंतर त्याच्या दक्षिण ध्रुवाजवळील तीन संभाव्य लँडिंग साइट्सपैकी एकावर उतरण्यापूर्वी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ५-७ दिवस घालवेल. भारताचे चंद्रयान 3 आणि रशियाचे यान सोबतच लँड करु शकते.
9 / 11
खडबडीत भूभागामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे कठीण होते. दक्षिण ध्रुव हे एक मौल्यवान ठिकाण आहे या ठिकाणी भरपूर बर्फ असू शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ज्याचा वापर इंधन आणि ऑक्सिजन तसेच पिण्याचे पाणी काढण्यासाठी केला जाऊ शकतो.
10 / 11
रशियाच्या रोसकॉसमॉसने सांगितले की, दोन मोहिमा एकमेकांच्या आड येणार नाहीत कारण त्यांनी वेगवेगळ्या भागात उतरण्याचे नियोजन केले आहे. रोसकॉसमॉसने एका निवेदनात म्हटले आहे की, 'दोन अंतराळयान एकमेकांच्या मार्गात येतील किंवा आदळतील असा कोणताही धोका नाही. चंद्रावर प्रत्येकासाठी पुरेशी जागा आहे.
11 / 11
चंद्रयान-3 हे दोन आठवडे प्रयोग चालवण्यासाठी डिझाइन केले आहे, तर लुना-25 चंद्रावर वर्षभर काम करेल. १.८ टन वजन आणि ३१ किलोग्रॅम वैज्ञानिक उपकरणे घेऊन, Luna-25 १५ सेमीने गोठलेल्या पाण्याच्या उपस्थितीची चाचणी घेणार. ६ इंच खोलीतून खडकाचे नमुने घेण्यासाठी स्कूप वापरेल.
टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3technologyतंत्रज्ञानisroइस्रो