शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंद्रयान ३ चा कॅमेरा सेफ जागा शोधतोय, सारखा फोटो काढतोय, पण...; इस्त्रोने राखीव दिवस ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 8:00 AM

1 / 10
रशियाची चंद्रमोहिम सपेशल फेल ठरल्यानंतर आता जगाचे डोळे भारताच्या चंद्रयान-३ कडे लागले आहेत. इस्त्रोसाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता चंद्राच्या काळोख्या पृष्ठभागावर चंद्रयान उतरणार आहे. परंतू, त्यापूर्वी आजचा दिवस त्याहून महत्वाचा आहे. कारण सुरक्षित उतरण्यासाठी चंद्रयान चंद्राच्या जागेचे फोटो काढत आहे.
2 / 10
23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान चांद्रयान-3 च्या लँडरला लँडिंगसाठी योग्य जागा मिळाली नाही, तर लँडिंग पुढे ढकलले जाऊ शकते. ही एक प्रकारची बॅकअप योजना आहे. मोठे दगड आणि खड्डे नाहीत अशी जागा लँडर 'विक्रम' आता त्याच्या LHDAC कॅमेराद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शोधली जात आहे.
3 / 10
इस्रोचे गुजरातमधील अहमदाबाद येथे एक केंद्र आहे. त्याचे नाव स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) आहे. त्याचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितले की, 23 ऑगस्ट 2023 रोजी लँडिंगच्या दोन तास आधी इस्रोचे मुख्य शास्त्रज्ञ लँडिंग करायचे की नाही याचा निर्णय घेतील.
4 / 10
विक्रम ऑनबोर्ड कॅमेरा धोके शोधण्यात आणि टाळण्यास सक्षम आहे. सॉफ्ट लँडिंग साइटचे मॅपिंग आणि छायाचित्रण करत आहे. त्याने काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो हे लँडिंगची जागा शोधण्यात मदत करतील. या कॅमेऱ्याच्या मदतीने विक्रम सर्व आव्हानांचा अंदाज घेण्यास सक्षम आहे.
5 / 10
लँडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायचे आहे, ज्याबद्दल जग अजूनही अंधारात आहे आणि त्या भागाबद्दल फारच कमी माहिती आहे. कारण ही जागा कायमस्वरुपी सूर्यप्रकाशापासून दुर असते. यामुळे तिथे अंधार असतो.
6 / 10
उतरण्यासाठी योग्य जागा मिळाली की नाही. लँडरची परिस्थिती कशी आहे? तसेच चंद्राच्या वातावरणाची आणि पृष्ठभागाची स्थिती काय आहे. ते लँडिंगसाठी योग्य आहे का? काही त्रुटी आढळल्यास 27 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चे लँडिंग होणार आहे. कोणतीही अडचण नसल्यास, 23 ऑगस्ट रोजी लँडिंग केले जाईल.
7 / 10
लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC), लेझर अल्टिमीटर (LASA), लेझर डॉप्लर व्हेलॉसिटीमीटर (LDV) आणि लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (LHVC) एकत्रितपणे कामाला लागले आहेत. हे सर्व चंद्रयानासाठी योग्य जागा शोधत आहेत.
8 / 10
विक्रम लँडर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, तेव्हा त्याचा वेग सुमारे 2 मीटर प्रति सेकंद असेल. परंतु हॉरिझोंटल गती प्रति सेकंद 0.5 मीटर असेल. विक्रम लँडर 12 अंश झुकाव असलेल्या उतारावर उतरू शकतो. ही सर्व उपकरणे विक्रम लँडरला हा वेग, दिशा आणि सपाट जमीन शोधण्यात मदत करणार आहेत. ही सर्व उपकरणे लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 500 मीटर अंतरावर असताना कार्यान्वित होतील.
9 / 10
चंद्रयान-2 मधून आपण शिकलेल्या धड्यांच्या आधारे ही यंत्रणा अधिक सक्षमतेने तयार करण्यात आली आहे. आशा आहे की यावेळेस ते पृष्ठभागावर उतरण्यात यशस्वी होईल. 2019 मध्ये, चंद्रयान-2 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करणार असतानाच त्याचे लँडर विक्रम क्रॅश झाले होते.
10 / 10
चंद्रयान २ हे दोन किमीवर असताना ही चूक झाली होती. आता देशवासियांना चंद्रयान ३ साठी प्रार्थना करावी लागणार आहे. कारण रशियाचे यान फेल करणारे थ्रस्टर, सेंसर, अल्टीमीटर, कॉम्प्यूटर सॉफ्टवेयर आणि अनेक गोष्टींना एकाचवेळी एकमेकांशी सांगड घालत काम करावे लागणार आहे.
टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो