शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 5:03 PM

1 / 5
Chandrayaan 3 Launch : भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-3 चे अखेर प्रक्षेपण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या ऐतिहासिक उड्डाणाची तयारी सुरू होती. या प्रक्षेपणानंतर देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञ-अभियंत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रक्षेपणाची संपूर्ण जबाबदारी ISRO चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या खांद्यावर होती. अनेकजण आता सोमनाथ यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
2 / 5
इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांच्या संपूर्ण टीमचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये माजी प्रमुख के सिवन यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सोमनाथ यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे, 13 जुले रोजी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी सोमनाथ यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी तिरुपती बालाजी मंदिरात प्रार्थना केली.
3 / 5
कोण आहेत एस सोमनाथ ? इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांचा जन्म जुलै 1963 रोजी केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण केरळमध्येच झाले. त्यांनी केरळ विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. विद्यापीठाच्या टॉपर्समध्ये त्यांचा समावेश होता. यानंतर त्यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना सुवर्णपदकही मिळाले.
4 / 5
डॉ. एस. सोमनाथ यांच्या पत्नी जीएसटी विभागात कार्यरत असून, वलसाला असे त्यांचे आहे. दोघांना दोन मुले आहेत, ज्यांनी अभियांत्रिकीचे पीजी शिक्षण पूर्ण केले आहे. डॉ. सोमनाथ यांना चित्रपट पाहायला आवडतात. ते तिरुअनंतपुरममधील फिल्म सोसायटीचे सदस्यही राहिले आहेत. डॉ. सोमनाथ यांना स्पेसक्राफ्ट लॉन्च व्हेईकल डिझाईन, इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाइन, मेकॅनिझम, पायरोटेक्निक्स आणि इंटिग्रेशनमध्ये नैपुण्य आहे. इस्रोच्या प्रत्येक मोहिमेवर त्यांचे बारीक लक्ष असते.
5 / 5
14 जानेवारी 2022 रोजी इस्रोची जबाबदारी डॉ. सोमनाथ यांना देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ नियुक्तीच्या तारखेपासून तीन वर्षांचा असेल. इस्रो प्रमुखासोबत ते अंतराळ विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष देखील आहेत. यापूर्वी ते तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक होते. सोमनाथ यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला पीएसएलव्ही प्रक्षेपणनाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना GSLV Mk III साठी उत्कृष्टता पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चांद्रयान-3Indiaभारत