शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chandrayaan-3 च्या लँडरने चंद्र आणि पृथ्वीचे फोटो घेतले; नवीन फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 1:00 PM

1 / 10
चंद्रयान 3 मध्ये शक्तिशाली कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आज चंद्रयानाने काही फोटो पाठवले आहेत. लँडरच्या कॅमेराने पृथ्वीचे फोटो घेतले.
2 / 10
चंद्राच्या कक्षेत जात असताना दुसऱ्या कॅमेऱ्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेतले. हे फोटो ISRO ने शेअर केले आहेत.
3 / 10
14 जुलै 2023 रोजी, चंद्रयान-3 ने GSLV-Mk3 रॉकेटमधून उड्डाण केले. चंद्रयान-३ अवकाशात पोहोचल्यावर त्याच्या लँडरवर बसवलेल्या लँडर इमेजर कॅमेराने पृथ्वीचे फोटो घेतले.
4 / 10
या फोटोत पृथ्वीवर पांढऱ्या ढगांची चादर दिसत आहे. कालच चंद्रयान-3 ने विचारले होते की फोटो पाठवायचे का? यानंतर, 5 ऑगस्ट रोजी, जेव्हा चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत गेले तेव्हा त्याच्या लँडरचा दुसरा कॅमेरा म्हणजेच लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (LHVC) ने चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेतले. यामध्ये गुजरातमधील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने (SAC) LI कॅमेरा बनवला आहे.
5 / 10
LHVC हे इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS), बेंगळुरूच्या प्रयोगशाळेने तयार केले आहे. LHVC प्रत्यक्षात लँडरच्या खालच्या भागात बसवले आहे. तो कॅमेरा पृथ्वीचा फोटो घेतो.
6 / 10
जेणेकरून लँडरचा लँडिंग आणि हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत तरंगण्याचा वेग कळू शकेल. तसेच, यात धोक्यांचा अंदाजही लावता येतो.
7 / 10
सध्या चंद्रयान-३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत फिरत आहे. त्याची कक्षा 174 किमी x 1437 किमी आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी, जेव्हा चंद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले.
8 / 10
त्यानंतर त्याने चंद्राची पहिले फोटो प्रसिद्ध केले. त्यानंतर चंद्रयान-3 164 x 18074 किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने चंद्राभोवती फिरत होते. जी नंतर 6 ऑगस्ट रोजी 170 x 4313 किमीच्या कक्षेत कमी करण्यात आली.
9 / 10
चंद्रावर 14 लाख खड्डे आहेत. 9137 पेक्षा जास्त खड्डे ओळखण्यात आले आहेत. 1675 चे वय देखील निश्चित केले आहे. मात्र हजारो खड्डे आहेत. जे मानवाला बघताही आलेले नाही. कारण त्याची गडद बाजू पाहणे अवघड आहे. हे खड्डे काही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील तयार होतात.
10 / 10
चंद्रावर 14 लाख खड्डे आहेत. 9137 पेक्षा जास्त खड्डे ओळखण्यात आले आहेत. 1675 चे वय देखील निश्चित केले आहे. मात्र हजारो खड्डे आहेत. जे मानवाला बघताही आलेले नाही. कारण त्याची गडद बाजू पाहणे अवघड आहे. हे खड्डे काही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील तयार होतात.
टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो