शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! ऑस्ट्रेलियाच्या आकाशात चंद्राप्रमाणे चमकले भारताचे चंद्रयान, नजाऱ्याने जिंकली लोकांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 3:56 PM

1 / 9
भारताची तिसरी चंद्र मोहीम चंद्रयान ३ जगभरात चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियात रात्री चांद्रयान-3 रॉकेटचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
2 / 9
भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) शास्त्रज्ञांनी शनिवारी चंद्रयान ३ ला चंद्राच्या कक्षेत नेण्याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. चंद्रयान-३ ची स्थिती सामान्य आहे. चंद्रयान-३ आता ४१,७६२ किमी बाय १७३ किमी कक्षेत आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या चंद्रयान-३ या मोहिमेवर आहेत.
3 / 9
देशासह परदेशातील शास्त्रज्ञही या प्रोजेक्टकडे डोळे लावून बसले आहेत, तसेच त्याच्या यशासाठी शुभेच्छाही देत ​​आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे वाहन प्रक्षेपित करण्यात आले.
4 / 9
२३ ऑगस्टपर्यंत हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चंद्रयान प्रक्षेपणाची अद्भुत घटना केवळ शास्त्रज्ञच पाहत नाहीत, तर जगभरातील लाखो लोकांनी ते YouTube वर थेट पाहिले. चंद्रयानच्या प्रक्षेपणची चर्चा जेवढी सुरू आहे, तेवढेच लक्ष अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या आकाशात दिसलेल्या चांद्रयानच्या एका झलककडे वेधले जाते.
5 / 9
Dylan O'Donnell ने आपल्या YouTube चॅनल आणि Twitter वर चंद्रयानचा फोटो शेअर केला आहे, यामध्ये चंद्रयान चंद्राप्रमाणे चमकत असलेल्या आकाशात दिसत आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'भारताचे चंद्रयान काही वेळापूर्वीच यूट्यूबवर लॉन्च होताना दिसले. तीन मिनिटांनी तो माझ्या घराच्या छतावरून आकाशात जाताना दिसले. 'मला अशी आशा आहे. यावेळी इस्रोचे हे लँडिंग यशस्वी व्हावे, असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.
6 / 9
डायलनच्या यूट्यूब चॅनेलनुसार, त्याने बायरन बे ऑब्झर्व्हेटरीमधून त्याच्या डायोग्राफी फोटो ब्लॉगसाठी हे दृश्य कॅप्चर केले. सेलेस्ट्रॉन आणि फोटोग्राफिंग स्पेससाठी ते लिहितात आणि शाळेतील मुलांना विज्ञानाशी संबंधित माहितीही देतात.
7 / 9
या पोस्टला पहिल्या दोन दिवसांतच ७.४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आणि १२ हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या.
8 / 9
काही लोकांना चंद्रयानशी संबंधित तपशील जाणून घ्यायचे होते, तर काहींना फोटो क्लिक करायची होती.
9 / 9
एका वापरकर्त्याने विचारले की, हा एक लाँग एक्सपोजर शॉट आहे की स्टॅन्डर्ड फोटोग्राफी आहे. एका युजरने लिहिले की, हा एक जबरदस्त फोटो आहे. तर तिसऱ्याने या फोटो काढत असताना ते किती उंचीवर होते.
टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3