शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1 फेब्रुवारीपासून टीव्ही चॅनेलसाठीचे नियम बदलणार, जाणून घ्या बदलणाऱ्या नियमांबाबतची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 8:41 PM

1 / 7
येत्या 1फेब्रुवारीपासून टीव्ही चॅनेल पाहण्यासाठीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. त्यामुळे आपल्या डीटीएच, तसेच केबल ऑपरेटर्सकडून आपल्याला हवे असलेले चॅनेल कसे निवडायचे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशाच काही प्रश्नांची उत्तरे.
2 / 7
बदललेल्या नियमानुसार तुम्हाला तु्म्ही पाहत असलेल्याच चॅनेल्सचे पैसे द्यावे लागतील. त्यामुळे केबल, डीटीएच ऑपरेटर्स तुम्हाला नको असलेल्या चॅनेल्सचे पैसे वसूल करू शकणार नाही.
3 / 7
आता 100 मोफत टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी तुम्हाला दरमहा 130 रुपये आणि जीएसटीसहीत 150 रुपये मोजावे लागतील. त्यानंतरच्या प्रत्येकी 25 चॅनेलसाठी 20 रुपये मोजावे लागतील. तर पे चॅनेलसाठी पैसे मोजावे लागतील.
4 / 7
ट्रायकडून पे चॅनेलसाठी प्रत्येकी 1 रुपया ते 19 रुपयांपर्यंतची किंमत ठेवली आहे. पे चॅनेलसाठी पैसे मोजावे लागल्याने अधिक पैसे मोजावे लागतील, अशी शंका अनेकांना आहे. मात्र सर्वसाधारणपणे 40 चॅनेल पाहिले किंवा सर्फ केले जातात, असे ट्रायचे निरीक्षण आहे.
5 / 7
चॅनेल निवडण्यामध्ये ग्राहक आणि ऑपरेटरची परस्पर सहमती असेल, तर काहीच प्रश्न नाही, असे ट्रायचे म्हणणे आहे.
6 / 7
सर्व फ्री टू एअर चॅनेलचा समवेश मोफत चॅनेलमध्ये करण्यात आलेला आहे. तसेच दूरदर्शनचे सर्व चॅनेल केबल, डीटीएच ऑपरेटर्सना दाखवावे लागतील.
7 / 7
डीटीएच कंपन्यांच्या वेबसाइटवर चॅनेलची लिस्ट उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच ट्रायनेसुद्धा आपल्या संकेतस्थळावर 342 चॅनेलची यादी प्रसिद्ध केलेली आहे.
टॅग्स :Televisionटेलिव्हिजनTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय