Charanjit Singh Channi relation's with controversy; message to women IAS officer me too
Charanjit Singh Channi: महिला IAS ला 'Me Too' मेसेज, टॉस उडवून पोस्टिंग बरेच काही...; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे वादाशी नाते By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 2:26 PM1 / 7पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab new CM) चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांचे वादाशी जुने नाते राहिले आहे. रविवारी त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर त्यांच्या या किस्स्यांची चर्चा रंगली. आज चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. टॉस उडवून पोस्टिंग देणे असेल किंवा महिला आयएएस अधिकाऱ्याला आपत्तीजनक मेसेज पाठवून मीटूच्या वादात अडकणे असेल या साऱ्या गोष्टींची चर्चा होत आहे. (Charanjit Singh Channi relation's with controversy; viral on Social media from Sunday.)2 / 7चन्नी यांचे पंजाबच्या विधानसभेतील एक वक्तव्यदेखील खूप व्हायरल होत आहे. कॅप्टन अमरिंदर सरकारच्या कामाबाबत विषयावर त्यांनी खड्डेमय रस्त्यांवरील पॅचवर्क असे म्हटले होते. 3 / 7चरणजीत चन्नी हे जेव्हा तंत्रज्ञान शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी 3 वर्षांपूर्वी पॉलिटेक्निक इंन्सि्ट्यूटमध्ये भरती करण्यात आली होती. यासाठी लेक्चरर पदासाठीचे दोन अर्जदार एकाच जागेवर पोस्टिंगसाठी अडून बसले होते. यावेळी चन्नी यांनी टॉस उडवून याचा निकाल लावला होता. 4 / 72018 मध्ये चन्नी यांनी एका महिला अधिकाऱ्याला आपत्तीजनक मेसेज पाठविला होता. यावर कॅप्टननी चन्नी यांना त्या अधिकाऱ्याची माफी मागण्यास सांगितले होते. यावर पडदा पडलाच होता की यंदा मे मध्ये हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी यावर कारवाई झाली नाही तर त्या उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. 5 / 72018 मध्ये चन्नी मंत्री होते, तेव्हा ज्योतिषाच्या सांगण्यावरून त्यांनी सरकारी घराचा नकाशाच बदलला होता. राजकारणात यशासाठी त्यांनी घराची एन्ट्री पूर्वेकडे केली होती. यासाठी त्यांनी ग्रीन बेल्ट तोडून रस्ता बनविला होता. अखेर चंदीगढ प्रशासनाने रस्ता हटवून पुन्हा ग्रीन बेल्ट तयार केला. 6 / 7राजकारणात यशस्वी होण्यासाठी चन्नी यांनी खरडच्या आपल्या घरी हत्तीवरून सवारी केली होती. तेव्हाही त्यांना ज्योतिषाने असे केल्यास तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असे सांगितले होते. 7 / 7चन्नी काही काळासाठी पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील होते. तेव्हा अकाली दल- भाजपाचे सरकार होते. सुखबीर बादल उप मुख्यमंत्री होते. सुखबीर यांनी विधानसभेत चन्नी यांना विचारले की 2002 ते 2007 मधील कॅप्टन सरकारचे एकतरी विकासकाम सांगा. यावर चन्नी यांनी मागचा पुढचा विचार न करता, कॅप्टन साहेबांनी संपूर्ण पंजाबमध्ये रस्त्यांचे पॅचवर्क केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications