Chennai Married man reached to meet instagram friend in hotel room that friend was his wife
लग्न झालेल्या तरुणाची इंस्टाग्रामवर तरुणीसोबत रंगली 'मैत्री', हॉटेलच्या रूममध्ये भेटायला गेला, निघाली 'पत्नी' By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 12:49 AM1 / 8एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स (Extra Marital Affairs)संदर्भात आपण अनेक किस्से ऐकले असतील. मात्र बहरीनमध्ये काम करणारा एक 29 वर्षीय तरुण अफेअरच्या चक्करमध्ये आपल्याच पत्नीच्या जाळ्यात अडकला. या तरुणाला अडयार (Adyar) येथील ऑल वुमन पोलीसांनी गुरुवारी चेन्नईतील तिरुवन्मियूरमधील एका हॉटलमधून अटक केली. 2 / 8हा तरुण आपल्या सोशल मीडिया मित्राला भेटण्यासाठी संबंधित हॉटेलच्या खोलीत गेला आणि तेथे आपल्या पत्नीला पाहून त्याला धक्काच बसला. मात्र, त्याच्या पत्नीने आधीच पोलिसांना बोलावले असल्याने त्याला रूमबाहेर पडता आले नाही. 3 / 8चेन्नई येथील निलांकरई येथील 25 वर्षीय महिलेने एक वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये अरुंबक्कम येथील अनिवासी भारतीय (Non Resident Indian) तरुणासोबत लग्न केले होते. 4 / 8नग्न फोटोज पाहून पत्नीलाही बसला धक्का - संबंधित महिलेने पोलिसांना माहिती देताना म्हटले आहे, की एक दिवस ती चुकून आपल्या पतीच्या डेस्कटॉपवर सरफिंग करत होती. यावेळी तिला त्याच्या नग्न फोटोंसह फोन नंबर तथा अनेक महिलांचे फोटो दिसले आणि ते पाहून तिला धक्काच बसला.5 / 8पत्नीनं तयार केलं फेक अकाउंट - आपला पती महिलांना वेश्या व्यवसायासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रलोभन देत असल्याचेही संबंधित महिलेच्या लक्षात आले. यानंतर तिने पतीचा पर्दाफाश करण्यासाठी, बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्याला जाळ्यात अडकवले.6 / 8महिलांचा देह व्यापार करायचा पती - महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती महिलांना देह व्यापारासाठी प्रवृत्त करत होता. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती मेसेज पाठवून महिलांना जास्त पैसे देणारे ग्राहक देण्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होता.7 / 8अश्लील व्हिडिओजच्या आहाही गेला होता पती - यासंदर्भात बोलताना पोलिसांनी म्हटले आहे, की संबंधित तरूण अश्लिल व्हिडिओच्या आहारी गेला होता. त्याला अश्लिल व्हिडिओजचे व्यसन लागले होते. मात्र, त्याचा वेश्याव्यवसायाशी काही संबंध होता का, याचा तपास करावा लागेल.8 / 8अडयार ऑल महिला पोलीस स्टेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित तरुणाचा फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या 29 वर्षीय तरुणाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications