नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 01:16 IST
1 / 7सोशल मीडियावरील अल्पवयीन मुलांची सक्रिया वाढली असून, त्याचे अनेक दुष्परिणामही दिसत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून आता मोठा निर्णय घेतला आहे.2 / 7आता १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्यासाठी आईवडिलांची परवानगी घ्यावीच लागणार आहे. 3 / 7ही तरतूद केंद्राच्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम २०२३ च्या मसुद्यातील नियमात करण्यात आली आहे. यासंदर्भातील केंद्राने शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे.4 / 7केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, मसुद्यातील नियमांबद्दल लोकांनी त्यांच्या सूचना आणि आक्षेप असतील, तर ते सरकारला सांगावेत.5 / 7या नियमांबद्दल लोकांना त्यांच्या सूचना किंवा तक्रारी असतील, तर MyGov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदवता येणार आहेत. १८ फेब्रुवारी २०२५ नंतर या तक्रारी आणि सूचनांचा विचार केला जाणार आहे.6 / 7या नियमांचे पालन केले जाईल, यावर देखरेख करण्यासाठी सरकार एक डेटा प्रोटेक्शन बोर्ड स्थापन करणार आहे. डिजिटल बोर्ड व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी करेल.7 / 7नियमांचं उल्लंघन झाले असेल, तर त्याची चौकशी करून संबंधितांना दंड केला जाईल. लहान मुलांच्या डेटा वापरावर लक्ष्य देण्याबरोबरच ग्राहकांचा डेटा संकलित करणाऱ्या कंपन्यांबद्दलचे नियमही कडक केले जाणार आहेत.