...म्हणून भारताच्या मुत्सद्देगिरीपुढं झुकला चीन! 50 दिवसांच्या संघर्षानंतर 'मजबूर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 16:25 IST
1 / 8लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) जवळपास 50 दिवसांच्या तणावानंतर माघार घेण्याचे चीनने मान्य केले आहे. दारू-गोळा, शस्त्रसाठा, सैन्य हे सर्व सीमेवर आणून चीनने त्याची तागद दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, भारताची स्पष्ट भूमिका आणि तागदीचा अंदाज आल्यानंतर, आपण परत भरताला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर महागात पडू शकते, असे चीनला वाटले. स्वतः लष्कर प्रमुख सीमेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.2 / 8एकीकडे, संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना, दुसरीकडे, चीनचा कावा सुरूच होता. त्याने लडाखमधील नियंत्रण रेषेवर भारतासोबत पुन्हा नवा वाद सुरू केला. अशा सर्व परिस्थितीत भारतीय लष्कराला 50 दिवसांपर्यंत गलवान खोऱ्यात चीनला चोख उत्तर द्यावे लागले. यानंतर चीन पुन्हा सरळ मार्गावर येताना दिसत आहे.3 / 8भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे चीनची चिंता वाढली आहे. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्त दिल्याने तर चीन चिंतित आहेच, पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्याने त्याची चिंता आणखी वाढवली आहे. रशियासोबत भारताची मैत्री आणि एस-400 मिसाइल्सनी तर चीनची चिंता अधिकच वाढली आहे.4 / 8चीनचे मनसुबे जगाने ओळखले आहेत. चीनमधीलच जुन्या नकाशांवरून, सिद्ध होते, की गलवान खोरे आणि काही इतर भागही भारताच्याच हद्दीतच येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून, चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे शेजारील देशांशीही त्याचे संबंध बिघडलेले आहेत. मात्र, यावेळी भारताबरोबरचा संघर्ष त्याच्यासाठी डोकेदुखी बनला आहे.5 / 8गलवान खोऱ्यात चीनने जो धोका दिला त्याचा मास्टार माइंड चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांड प्रमुख कमांडर जनरल झाओ जोंग्कीला मानले जात आहे. आपल्या 20 वीर जवानांवर धोक्याने हल्ला करण्याचा कटही त्यानेचा होता. 6 / 8लडाखमध्ये चीन भारतासमोर उभा असतानाच त्याने एक पाऊल नेपाळमध्येही ठेवले आहे. नेपालने आधी कालापानी आणि इतर काही भागांवरून भारताशी वाद उकरून काढला. तर आता नागरिकतेवरून नव्या मुद्द्याला हात घातल आहे.7 / 8गलवानमध्ये झालेल्या चकमकीत चीनने भारतीय लष्काराची भूमिका आणि पराक्रम पाहिला आहे. यापूर्वी 1962मध्ये भारताजवळ शस्त्रसाठा आणि दारू-गोळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हता. 8 / 8आता भारताकडे चौकस नौ दल, शक्तीशाली पायदळ आणि अत्यधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेले हवाई दल आहे. आज भारताकडे, कोणत्याही देशाचा सामना करण्याचे सामर्थ्य आहे.