China threat india now friend russia will soon give fighter jet
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 2:45 PM1 / 8गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांच्या बालिदानानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. सीमेवर एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे चीनचा सामना करण्यासाठी भारताला लढाऊ विमानांची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी भारतीय हवाई दलाने सरकारला प्रस्तावही पाठवला आहे.2 / 8हवाई दलाने रशियाकडून 21 नवे मिग -29 आणि 12 Su-30MKI घेण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. यातच, आम्ही भारताची आवश्यकता पाहता ही विमाने अधिक आधुनिक करून लवकरात लवकर देण्यासाठी तयार आहोत, असे रशियाने म्हटले आहे.3 / 8मिग-29 विमाने आधुनिक करतोय रशिया - WION न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया आणि भारत सरकारदरम्यान होणाऱ्या या सौद्यासाठी मॉस्को पूर्णपणे तयार आहे. असेही सांगण्यात येते, की सध्या रशिया मिग-29 लढाऊ विमाने अधिक आधुनिक रण्याच्या कामात लागला आहे. 4 / 840 वर्ष देईल सेवा - मिग-29 विमानाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते चौथ्या पिढीच्या लढाऊ विमानाबरोबरीचे होती. आधुनिक सामग्री आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे विमान पुढील 40 वर्षे भारतीय हवाई दलाला आपली सेवा देईल.5 / 8शत्रू ओळखण्यासही होईल अधिक सक्षम - आधुनिकीकरणानंतर मिग-29 विमान रशिया आणि इतर देशांची आधुनिक शस्त्रे घेऊन वेगाने आणि अधिक उंचावरही उडू शकेल. एवढेच नाही, तर हे विमान शत्रू ओळखण्यासही अधिक सक्षम होईल. 6 / 8ब्रह्मोसने सुसज्ज असेल सुखोई-30 MKI जेट - भारत 12 सुखोई-30 MKI विमानेही विकत घेत आहे. भारताकडे असलेली सुखोई विमाने याच वर्षी जानेवारी महिन्यात ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करण्यात आली होती. सांगण्यात येते, की आता सुखोई विमाने हवेतून हवेत मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्यात येणार आहेत.7 / 8सुखोई-30 विमाने अत्यंत प्रभावी - सुखोई-30 विमाने अत्यंत प्रभावी मानले जातत. ही विमाने भारत आणि रशियातील मैत्रीचे प्रतिक मानले जातात. भारताने 10 ते 15 वर्षांच्या काळातच अनेक वेळा 272 Su-30 फायटर जेट्ससाठी आदेश दिले आहेत. 8 / 86 हजार कोटी रुपयांत मिळणार 33 फायटर जेट - मिग - 29ची एअरफ्रेम अधिक काळापर्यंत काम करू शकते. मिग -29 हवाई दलाकडून उडवलेही जातात. तसेच पायलटलाही याची माहिती असते. हवाई दलाकडे मिग -29 चे तीन स्क्वाड्रन आहेत. सांगण्यात येते, की या विमानांच्या खरेदीसाठी जवळापस 6 हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications