भारत कोरोना संकटात असताना चीन साधतोय संधी; 'या' देशाच्या मदतीनं वाढवतोय अडचणी? By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 3:52 PM
1 / 10 चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूचा सामना अवघं जग करत असताना चीनकडून मात्र विविध मार्गांनी कुरघोड्या केल्या जात आहेत. 2 / 10 कैलास मानसरोवरपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारत उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये चीन-नेपाळ सीमेजवळील लिपुलेख पासपासून ५ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. 3 / 10 या रस्त्याच्या उद्घाटनावर नेपाळनं आक्षेप नोंदवला. विशेष म्हणजे याआधी कधीही नेपाळनं या रस्त्यावरून वाद निर्माण केला नव्हता. 4 / 10 नेपाळ चीनच्या इशाऱ्यावरुन नव्या रस्त्याला विरोध करत असावा, अशी शक्यता भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज नरवणे यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. 5 / 10 नरवणे यांनी चीनचा थेट उल्लेख केला नाही. मात्र नेपाळच्या विरोधामागे अप्रत्यक्षपणे चीनचा हात असल्याचं सुचवलं. 6 / 10 यामध्ये कोणताच वाद असल्याचं मला वाटत नाही. काळ्या नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचं असल्याचं त्यांच्या राजदुतांनी सांगितलं. मात्र त्यावरुन कोणताही वाद नसल्याचं ते म्हणाले होते, असं नरवणेंनी म्हटलं. 7 / 10 काळ्या नदीच्या पूर्वकडील भाग नेपाळचा आहे, असं त्यांचे राजदूत सांगतात. मात्र भारतात तयार केलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे, या गोष्टीकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधलं. 8 / 10 काळ्या नदीकडून पुढे सरकल्यानंतर एक ट्राय जंक्शन आहे. त्या ठिकाणी भारत, नेपाळ, चीनच्या सीमा आहेत, अशी माहिती नरवणेंनी दिली. 9 / 10 ट्राय जंक्शन भागात एखादा लहान-मोठा वाद असू शकतो. त्यामुळे नेपाळला काहीतरी अडचण असावी, असं लष्करप्रमुख म्हणाले. 10 / 10 नेपाळनं कोणाच्या तरी सांगण्यावरुन रस्त्याला विरोध केला असावी. नेपाळ दुसऱ्याच्या इशाऱ्यावरुन आक्षेप नोंदवत असल्याची दाट शक्यता नरवणेंनी बोलून दाखवली. आणखी वाचा