शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिंद महासागरात घुसलं चीनचं हेरगिरी करणारं जहाज; श्रीलंकेची माहिती, भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 3:20 PM

1 / 10
चीन जगभरात घुसखोरी आणि हेरगिरीसाठी कुप्रसिद्ध आहे, तरीही तो त्याच्या कारवायांपासून परावृत्त होत नाही. आता, श्रीलंकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, चीनचे शक्तिशाली गुप्तचर जहाज शी यान ६ हिंद महासागरात घुसले आहे आणि ते भारताच्या दिशेने पुढे जात आहे.
2 / 10
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज हिंद महासागराच्या मध्यभागी 90 अंश पूर्व रेखांशाच्या शिखरावर आहे आणि श्रीलंकेच्या दिशेने पुढे सरकतंय.
3 / 10
विशेष म्हणजे, २०१९ पासून, सुमारे ४८ चीनी वैज्ञानिक संशोधन जहाजे हिंद महासागर क्षेत्रात (IOR) तैनात करण्यात आली आहेत
4 / 10
तैनातीचे सामान्य क्षेत्र बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्र आहे. Xi Yan 6 हे चिनी संशोधन जहाज आहे.
5 / 10
हे जहाज नॅशनल एक्वाटिक रिसोर्सेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट एजन्सी (NAR) सोबत संशोधन करते असं चीनचे म्हणणे आहे.
6 / 10
परंतु तज्ञांचा दावा आहे की ते एक चिनी हेरगिरी जहाज आहे. शी यान ६ जहाज हे विज्ञान आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चीनच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेतील एक प्रमुख प्रकल्प आहे. उद्घाटनानंतर दोन वर्षांनी, 2022 मध्ये या जहाजाने पूर्व हिंदी महासागरात आपला पहिला प्रवास यशस्वीपणे केला.
7 / 10
श्रीलंकेच्या रानिल विक्रमसिंघे सरकारने ऑक्टोबरमध्ये या चिनी संशोधन जहाजाला कोलंबो बंदरात उभे करण्याची परवानगी दिली नाही अद्याप त्यावर चर्चा सुरू आहे. आता श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताबद्दल चिंता व्यक्त केली. कोलंबोने भारतीय सुरक्षेच्या कारणास्तव चीनच्या शी यान 6 या जहाजाला श्रीलंकेकडे जाण्याची परवानगी दिलेली नाही.
8 / 10
श्रीलंकेसाठी भारतीय सुरक्षेची चिंता महत्त्वाची असल्याचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी सांगितले. यासोबतच यापुढे चर्चा सुरू असून जर जहाजाने श्रीलंकेच्या मानक कार्यपद्धतीचे पालन केले तर कोणतीही अडचण येणार नाही असंही त्यांनी म्हटलं.
9 / 10
एक महिन्यापूर्वी अमेरिकन थिंक टँकला दिलेल्या मुलाखतीत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे म्हणाले होते की, श्रीलंकेत एकही चिनी हेरगिरी जहाज नाही आणि जर जहाजाने श्रीलंकेने ठरवलेल्या SOP चे पालन केले तर त्यांना डॉकिंगची परवानगी देताना कोणतीही अडचण येणार नाही..
10 / 10
याआधी, गेल्या वर्षीही चीनचे यांग वांग-5 हे हेरगिरी जहाज हिंदी महासागरात आले होते आणि ज्याला भारतीय सीमेच्या हद्दीबाहेर फेकले होते.
टॅग्स :chinaचीनIndiaभारतSri Lankaश्रीलंका