शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CJI Uday Lalit: नाद करायचा, पण...! 12 दिवसांत 4000 खटले निकाली काढले; सरन्यायाधीश लळीत यांनी कामालाच लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:14 AM

1 / 6
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सरन्यायाधीश उदय लळीत यांनी गेल्या आठवड्यापासून सर्वोच्च न्यायालयात नवीन सिस्टीम लागू केली आहे. निवृत्त सरन्यायाधीश यांनी वकीलांच्या तक्रारीची खंत बोलून दाखविली होती. मला तिकडे लक्ष देता आले नाही असेही म्हटले होते. परंतू, वक्तशीर असलेल्या लळीत यांनी तेच करून दाखविले आहे. यामुळे न्यायमूर्ती नाराज जरी असले तरी १२ दिवसांत जे काही झालेय, ते उल्लेखनिय असेच आहे.
2 / 6
लळीत यांचा कार्यकाळ अवघ्या ७४ दिवसांचा आहे. यापैकी १२ दिवसांत लळीत यांनी खटले कसे निकाली काढायचे याची झलकच दाखवून दिली आहे. प्रदीर्घ काळ प्रलंबित खटल्यांची यादी तयार करून त निकाली काढण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. हे एक आव्हानच होते. कोरोनाच्या काळात अशा खटल्यांमध्ये आणखीनच वाढ झाली होती.
3 / 6
लळीत यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकूण 14000 खटले सूचीबद्ध करण्यात आले. यापैकी 3,797 खटले निकालीही काढण्यात आले आहेत. २९ ऑगस्टपासून लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयात एक नवीन सिस्टीम राबविली आहे. जुन्या खटल्यांमध्ये सामान्यतः जुन्या अपीलांचा समावेश होतो ज्या अंतिम सुनावणीच्या प्रतीक्षेत असतात. अशी प्रकरणे यंत्रणेला शोधायला लावून ती निकाली काढण्यात आली आहेत.
4 / 6
गेल्या 12 दिवसांत, सर्वोच्च न्यायालयाने एकूण 13,791 विविध प्रकरणे (2,447 हस्तांतरण याचिकांसह) आणि 3,084 नियमित प्रकरणे सुनावणीसाठी सूचीबद्ध केली आहेत. यापैकी, 3,531 विविध प्रकरणे (1,202 हस्तांतरण याचिकांसह) आणि 266 नियमित प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली आणि निकाली काढली.
5 / 6
नवीन प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 30 न्यायाधीशांसाठी दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत नव नवीन प्रकरणांवर सुनावणीसाठी १५ वेगवेगळी खंडपीठे नियुक्त केली आहेत. या खंडपीठांना दर दिवशी ६० प्रकरणावर सुनावणी घ्यायची आहे. तीन तीन जजच्या या बेंचनी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या पहिल्या शिफ्टमध्ये जुन्या प्रकरणांवर सुनावणी घेतली होती. दुपारच्या शिफ्टमध्ये दोन जजच्या बेंचना ३० केस देण्यात आल्या, या केसची सुनावणी त्यांना दोन तासांत करायची होती. म्हणजे एका केससाठी सरासरी ४ मिनिटे देण्यात आली. आता सीजेआयनी ही संख्या ३० वरून २० वर आणली आहे.
6 / 6
लळीत यांच्यापूर्वी जे सरन्यायाधीश होते त्या रमणा यांनी निवृत्तीनंतर वकील आपल्या याचिका लवकर लिस्ट होत नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या असे म्हटले होते. माझ्या कार्यकाळात मी याकडे लक्ष देऊ शकलो नाही, याचे शल्य वाटत असल्याचे रमणा यांनी म्हटले होते. यावर विचार करून लळीत यांनी नवीन लिस्टिंग प्रणाली लागू केली होती. मात्र, त्याला जज उघडपणे विरोध करू लागले आहेत.
टॅग्स :Uday Lalitउदय लळीतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय