शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्लीत रामराज्य! रामायणातील 'या' १० तत्त्वांचे सरकारकडून अनुसरण: केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:34 PM

1 / 10
दिल्लाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी 'आप'चे सरकार रामराज्य किंवा रामायणातील १० तत्त्वांचे अनुसरण करते, असे सांगत मी हनुमान भक्त आहे, हनुमंत रामभक्त होते. म्हणून मी दोघांचाही भक्त आहे, असे केजरीवाल यांनी पुन्हा एकदा घोषित केले आहे. (delhi government follows 10 principles of ram rajya)
2 / 10
एकदा अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर दिल्ली सरकार शहरातील सर्व वयोवृद्ध नागरिकांना मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याचा विचार करत आहे, असे आश्वासन केजरीवाल यांनी यावेळी बोलताना दिले.
3 / 10
दिल्लीतील जनतेची सेवा करण्यासाठी रामराज्य या संकल्पनेतून प्रेरित होऊन १० तत्त्वांचे अनुसरण करीत आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत सांगितले.
4 / 10
भगवान राम अयोध्याचा राजा होता. असे म्हणतात की, त्याच्या कारकिर्दीत सर्व काही चांगले होते. कोणीही दु: खी नव्हते. प्रत्येक सुविधा तिथे होती आणि म्हणूनच त्याला रामराज्य असे म्हणतात. रामराज्याच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन दिल्लीत लोकांची सेवा केली पाहिजे, असे केजरीवाल यांनी नमूद केले.
5 / 10
रामायणातील दहा तत्त्वे अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा, वीज, पाणीपुरवठा, रोजगार, घरे, महिलांना सुरक्षा आणि ज्येष्ठांचा सन्मान ही आहेत, असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.
6 / 10
दिल्लीत कुणीही उपाशी राहू नये, उपाशी झोपू नये, यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या विशेष योजना तयार करत आहे. दिल्लीतील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळायला हवे. सामाजिक प्रतिष्ठेची पर्वा न करता प्रत्येक मुलाने दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे. सर्वांना शिकण्याची समान संधी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
7 / 10
श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकाला शक्य तितक्या उत्तम वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. आम्ही सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारली आहेत आणि या दिशेने काम करताना मोहल्ला दवाखाने देखील सुरू केली आहेत.
8 / 10
कितीही गरीब असले, तरी त्या कुटुंबामध्ये अंधार राहता कामा नये. २०० युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवली जात आहे. असे करणारे दिल्ली एकमेव ठिकाण आहे. श्रीमंत असो वा गरीब सर्वांना पाणी मिळाले पाहिजे.
9 / 10
सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. प्रत्येकाकडे डोक्यावर छप्पर असावे. झोपडीमध्ये राहणाऱ्यांना पक्के घर मिळावे, यासाठी सरकारकडून काम केले जात आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून, सीसीटीव्ही यंत्रणा वाढवणे, बसमध्ये मोफत प्रवास यांसारख्या अनेक गोष्टी राबवल्या गेल्या.
10 / 10
दिल्ली सरकार शहरातील सर्व वयोवृद्ध नागरिकांना मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याचा विचार करत आहे. आम आदमी पक्षासाठी सर्वजण एकसमान आहेत. कोणत्याही जाती-धर्माचा असला, तरी सर्वांना समान वागणूक देण्यात येत आहे, अशी १० सूत्री केजरीवाल यांनी कथन केली.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीGovernmentसरकारAAPआप