The collector rejected Sonu Sood's claim for help, the actor showed evidence
कलेक्टरने सोनू सूदच्या मदतीचा दावा फेटाळला, अभिनेत्यानं पुरावाच दाखवला By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:52 AM1 / 11देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2 / 11वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत असताना पुन्हा एकाद बालिवूड अभिनेता आणि लॉकडाऊनचा मसिहा सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच तो दिग्गजांच्याही मदतीला धावून जात आहे.3 / 11सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. 4 / 11देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा जाणवतो आहे. यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लॉन्ट घेण्याचे ठरविले आहे. 5 / 11टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूदने फ्रान्स आणि इतर देशांमधून ऑक्सिजन प्लॉन्ट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यासाठी आणतो आहेत. त्यासोबतच तो अनेकांच्या अडचणींना दररोज तोंड देत आहे. 6 / 11सोनू सूदने सोमवारी ओडिशातील एका गरजू व्यक्तीला मदत केली होती. त्यानंतर सोनू सूदने ट्विट करुन संबंधित व्यक्तीला मदत मिळाल्याचेही सांगितले होते. 7 / 11सोनू सूदच्या ट्विटला रिट्विट करत ओडिशातील गंजाम जिल्ह्याचे कलेक्टर यांनी सोनू सूदच्या मदतीचा दावा फेटाळला होता. तसेच, सोनू सूदच्या फाऊंडेशनकडून कुठलिही मदत मिळाली नसल्याचे ट्विटरवरुन सांगण्यात आले होते. 8 / 11संबंधित व्यक्ती महापालिकेच्या निगराणीखाली असून त्यांना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. आमचा सोनू सूद फाऊंडेशनशी कुठलाही संपर्क झालेला नाही, असेही गंजाम कलेक्टरच्या अधिकृत ट्विटरवरुन म्हटले होते.9 / 11गंजाम कलेक्टरांच्या या ट्विटला सोनू सूदने थेट पुरावाच दाखवत उत्तर दिले. सोनूने संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांसोबत चॅटवर झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 10 / 11सर, आम्ही कधीच हा दावा केला नाही की, गरजवंत व्यक्तीने तुमच्याकडे मदत मागितली होती. आमच्याकडे गरजू व्यक्तीने मदत मागितली, त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था केली. 11 / 11मी आपल्या माहितीसाठी काही चॅट स्क्रीनशॉट शेअर करत आहे. आपलं कार्यालय चांगलंच काम करत आहे, आपण डबल चेक करू शकता. मी संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर पाठवला आहे. जय हिंद !, असे ट्विट सोनूने केलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications