शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लोकसंख्या वाढीची जगात स्पर्धा? भारत प्रथम क्रमांकावर येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:36 AM

1 / 10
नुकताच जागतिक लोकसंख्या दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल जारी केला. त्यात जगाच्या वाढत्या लोकसंख्येविषयीचा उहापोह करण्यात आला आहे.
2 / 10
काही ठोकताळेही मांडण्यात आले आहेत. त्यानुसार २०३० पर्यंत जगाची लोकसंख्या साडेआठ अब्ज आणि २०५० पर्यंत दहा अब्जांच्या आसपास असेल.
3 / 10
जागतिक लोकसंख्येत भारत आणि चीन या दोन आशियाई देशांचा मोठा वाटा असेल, असे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. त्यातही २०२३ मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल, असे जाहीर करून संयुक्त राष्ट्रांनी धक्का दिला आहे.
4 / 10
एरव्ही जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता, असे विचारले तर आपल्यापैकी अनेक जण चीनकडे बोट दाखवून दहापैकी दहा गुण पदरात पाडून घेत असतात. परंतु आता या प्रश्नाच्या उत्तरात चीनची जागा भारत घेणार असल्याने चर्चा होणे गरजेचे आहे.
5 / 10
अलीकडेच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण अहवाल जारी झाला. त्यात गेल्या दशकात देशाचा जननदर कमी झाल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे गेल्या दोन दशकांत प्रजनन दर ३.४ होता तो आता २.० एवढा झाला आहे.
6 / 10
लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारतर्फे करण्यात आलेल्या प्रचाराचे, प्रयत्नांचे फलित म्हणून प्रजनन दर कमी झाला असल्याचे मानले जाते. परंतु तरीही जागतिक लोकसंख्या वाढीचा विचार करता आपल्याकडील प्रजनन दर कमी होण्याचा वेग कमीच आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
7 / 10
लोकसंख्येच्या बाबतीत भारत पुढील वर्षी चीनला मागे टाकेल, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी नुकताच प्रसिद्ध केला. त्यावरून आपल्याकडे वादविवाद झडू लागले आहेत...
8 / 10
काहीकाळ तरी देशाच्या लोकसंख्येत वाढ होत राहील. मात्र, देशातील तरुणांनी एक वा दोन अपत्यावरच समाधान मानले तर संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०५०पर्यंत भारताची लोकसंख्या एक विशिष्ट टोक गाठेल, साधारणत:
9 / 10
१६० कोटींच्या पुढे लोकसंख्या असेल, आणि त्यानंतर तिचा प्रवास स्थिरतेकडून घसरणीकडे सुरू होईल, असे पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या संचालिका पूनम मुत्तरेजा यांचे मत आहे.
10 / 10
लोकसंख्या वाढ नियंत्रणात येईल? भारताची लोकसंख्या सद्य:स्थितीत १४१ कोटी असून चीनची लोकसंख्या १४२ कोटी एवढी आहे. पुढील वर्षापर्यंत भारत चीनला मागे टाकणार आहे. जगात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे.
टॅग्स :Indiaभारतchinaचीन