Comprehensive thinking, knowledge of 6 languages; This is the career of Dattatreya Hosballe
व्यापक विचार, ६ भाषांचे जाणकार; 'अशी' आहे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची कारकीर्द By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 7:06 PM1 / 12राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) बेंगळुरू येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. 2 / 12सन २००९ पासून ते संघाचे सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडत होते. RSS चे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व मावळते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला व एकमताने त्यांची निवड झाली.3 / 12बेंगळुरूच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS मध्ये मोठे बदल करण्यात आले. दत्तात्रय होसबळे हे मुळचे कर्नाटकमधील सोरबा तालुक्यातील एका खेडेगावातील आहेत. दत्तात्रेय होसबळे यांचा जन्म ०१ डिसेंबर १९५५ रोजी झाला होता. 4 / 12होसबळे यांचे प्राथमिक शिक्षण सागर इथे झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण होसबळे यांनी बेंगळुरूमध्ये घेतले. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होसबळे हे लहानपणीच संघाशी जोडले गेले होते. 5 / 12राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत प्रभावित झालेल्या होसबळे यांनी सन १९६८ मध्ये संघात प्रवेश मिळवला. सन १९७८ मध्ये ते ABVPचे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. तर पुढे १५ वर्षे त्यांनी ABVP च्या महासचिवपदाची जबाबदारी पार पाडली.6 / 12विद्यार्थी दशेत असताना होसबळे यांना साहित्य क्षेत्रातील घडामोडींमध्ये मोठी आवड होती. पुढे त्यांनी साहित्य क्षेत्रातील शिक्षणासाठी म्हैसूर विद्यापीठात प्रवेश मिळवला. कर्नाटकातील अनेक पत्रकार आणि लेखकांसोबत त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत.7 / 12होसबळे फुटबॉल खेळाचे मोठे चाहते असून, त्यांनी फुटबॉल हा खेळ वैश्विक एकतेचे प्रतिक असल्याचे म्हटले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील हिंदू स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक घडामोडींचे होसबळे संरक्षकही राहिले आहेत.8 / 12होसबळे कन्नड भाषेतील मासिक असीमाचे संस्थापक संपादक राहिले आहेत. तर, सन २००४ मध्ये त्यांना संघाचे अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख बनविण्यात आले. २००९ मध्ये ते संघाचे सहसरकार्यवाह बनले. होसबळे यांनी कन्नड, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि संस्कृत भाषांचे ज्ञान आहे. 9 / 12इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील आणीबाणीमध्ये होसबळे यांनी एक वर्ष तुरुंगवास भोगला आहे. गुवाहाटी, आसाम, विश्व छात्र संघटना आणि युवा विकास केंद्राच्या स्थापनेत होसबळे यांनी मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे.10 / 12दत्तात्रेय होसबळे आता भैयाजी जोशी यांची जागा घेणार आहेत. भैयाजी जोशी हे संघाच्या सरकार्यवाह पदावर जवळपास गेल्या १२ वर्षांपासून आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठ्या बदलाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.11 / 12संघाच्या विस्तारात होसबळे यांची मोठी भूमिका राहिली. २०१४ च्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांना भाजपचा चेहरा म्हणून समोर आणण्यासाठी होसबळे आग्रही होते. दत्तात्रेय होसबळे यांनी अनेक आपत्कालिन स्थितीत संघाच्या सेवाकार्यांचे नियोजन केले.12 / 12२०१५ साली नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपादरम्यान संघातर्फे मदतकार्य सुरू करण्यात आले होते. त्यावेळी नेपाळमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन होसबळे यांनी मोर्चा सांभाळला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications