Congress and JD(S) move their MLAs in Eagleton Golf Resort Bengaluru Resort
हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम' By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:56 AM1 / 7कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाकडून विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बहुमताच्या आकड्यासाठी 8 आमदार कमी पडत असल्याने भाजपाकडून इतर पक्षांचे आमदार फोडले जाण्याची शक्यता आहे.2 / 7आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेस व जनता दलाने सुरक्षिततेसाठी आपापल्या आमदारांना बंगळुरूतील ईगल्टन रिसॉर्ट व शांगरिला हॉटेलमध्ये ठेवले आहे.3 / 7ईगल्टन रिसॉर्ट हे बंगळुरू-मैसूर रस्त्यावर स्थित आहे.4 / 7ईगल्टन रिसॉर्ट हे काँग्रेसचे नेते डी.के.सिवाकुमार यांच्या मालकीचे आहे.5 / 7यापूर्वी गुजरात राज्यसभा निवडणुकीच्यावेळीही काँग्रेसच्या आमदारांना या रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते. 6 / 7जनता दलानेही (सेक्युलर) आपल्या पक्षाच्या आमदारांना बंगळुरूच्या शांगरिला हॉटेलमध्ये हलवले आहे.7 / 7भाजपाकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी असल्याने या काळात आमदारांच्या फोडाफोडीचे सत्र सुरू राहण्याचा अंदाज आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications