शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 5:34 PM

1 / 5
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ जुलै) दिल्लीच्या जीटीबी नगरमध्ये रस्त्यावरील आणि रोजंदारी कामगारांची भेट घेतली.
2 / 5
यासंदर्भात काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स-हँडलवरून फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये राहुल गांधी कामगारांसोबत काम करताना दिसत आहे. याआधीही राहुल गांधी यांनी अनेकदा अशाप्रकारे कामगारांची भेट घेतली आहे.
3 / 5
राहुल गांधींचे फोटो शेअर करताना काँग्रेसने म्हटले आहे की, 'आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जीटीबी नगरमध्ये कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हे कष्टकरी कामगार भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांचे जीवन साधे करणे आणि भविष्य सुरक्षित करणे ही आपली जबाबदारी आहे.'
4 / 5
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कामगार आणि भांडवल यांच्यातील संतुलन पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने औद्योगिक आणि कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.
5 / 5
याचबरोबर, काँग्रेसने मनरेगाचे वेतन ४०० रुपये प्रतिदिन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, काँग्रेस सत्तेत आल्यास प्रतिदिन तेवढ्याच रकमेचे राष्ट्रीय किमान वेतन देण्याची घोषणाही करण्यात आली होती.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस