congress likely to elect rahul gandhi as lok sabha new leader
पंतप्रधान मोदींविरोधात थेट मुकाबला रंगणार; राहुल गांधींकडे लवकरच मोठी जबाबदारी? By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 11:48 PM1 / 8काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला. विशेषत: पश्चिम बंगालमधला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला. 2 / 8बंगालमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत भाजपनं ३ वरून ७७ वर झेप घेतली. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा भोपळाही फोडता आलेला नाही.3 / 8प. बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे आता चौधरींचे पंख कापले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत चौधरी काँग्रेसचे गटनेते आहेत. लवकरच त्यांचं हे पद जाऊ शकतं.4 / 8अधीर रंजन चौधरी यांना गटनेतेपदावरून हटवून ती जबाबदारी राहुल गांधींकडे सोपवली जाऊ शकते. हिंदुस्तान टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. राहुल गांधींनी याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काँग्रेस नेते याविषयी बोलण्यास तयार नाहीत.5 / 8राहुल गांधींनी लोकसभेत गटनेतेपद स्वीकारावं यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी प्रयत्नशील असल्याची माहिती पक्षाच्या दोन नेत्यांनी दिली. 6 / 8राहुल गांधींनी लोकसभेतील गटनेतेपद स्वीकारल्यास पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा गांधी कुटुंबाबाहेरील कुटुंबाकडे देण्यात आली. त्यामुळे पक्षात बदल हवेत असा विचार मांडणाऱ्या २३ वरिष्ठ नेत्यांची मागणी पूर्ण होईल, असं काँग्रेसमधील दोन नेत्यांनी सांगितलं.7 / 8अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची कार्यकाळ २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाचा निर्णय नंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली.8 / 8राहुल गांधी संसदेत उपस्थित नसतात, संसदीय कमिटीच्या बैठकांना ते गैरहजर राहतात, अशी टीका भाजपकडून वारंवार करण्यात येते. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेत गटनेतेपद सांभाळावं यासाठी पक्षातील सगळेच नेते अनुकूल नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications