शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महागाई, नोटबंदी, भ्रष्टाचार...; 350 कोटी सापडलेल्या कॅश किंग धीरज साहूंचे 5 ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:11 IST

1 / 11
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. धीरज साहू यांच्या साहू ग्रुपवर टॅक्स चोरीचा आरोप आहे. याबाबत जेव्हा आयकर विभागाच्या पथकांनी झारखंड आणि ओडिशामधील त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.
2 / 11
साहूच्या छुप्या ठिकाणांहून आतापर्यंत 351 कोटी रुपये रोख मिळाले आहेत. दरम्यान, धीरज साहूचे अनेक ट्विटही व्हायरल होत आहेत. यामध्ये ते काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारची कोंडी केली होती.
3 / 11
धीरज साहू यांचे हे ट्विट शेअर करत भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. साहू यांनी ट्विट करून म्हटले होतं की, 'नोटाबंदीनंतरही देशात एवढा काळा पैसा आणि भ्रष्टाचार पाहून मन व्यथित होतं. समजत नाही लोक इतका काळा पैसा कुठून जमा करतात? '
4 / 11
'या देशातील भ्रष्टाचार कोणी मुळासकट उखडून टाकू शकत असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे.' धीरज साहू यांच्या ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर करताना अमित मालवीय यांनी धीरज प्रसाद साहू यांचा सेन्स ऑफ ह्यूमर कमाल असल्याचं म्हटलं आहे.
5 / 11
8 नोव्हेंबर 2021 रोजी धीरज साहू यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. नोटाबंदीने आपले कोणतेही उद्दिष्ट साध्य होण्याऐवजी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असं म्हटलं होतं.
6 / 11
धीरज साहू यांनी बनावट नोटांवरून केंद्रावर निशाणा साधला होता. तसेच भ्रष्टाचारावरून देखील हल्लाबोल केला होता.
7 / 11
वाढत्या संपत्तीच्या बाबतीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांचा वेग रॉकेटपेक्षाही जास्त आहे.
8 / 11
साहू यांनी अदानी आणि गरिबीच्या मुद्द्यावरून केंद्रालाही धारेवर धरलं होतं.
9 / 11
ओडिशा आणि झारखंडमधील त्याच्या घरातून 350 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे. कधी हातात बंदूक तर कधी प्राण्यांसोबतचे फोटो आता जोरदार व्हायरल होत आहेत.
10 / 11
काँग्रेस खासदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशा-आधारित डिस्टिलरी कंपनीविरुद्ध आयकर विभागाच्या छाप्यात जप्त केलेली रोकड पाच दिवसांच्या मोजणीनंतर 351 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
11 / 11
काँग्रेस खासदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशा-आधारित डिस्टिलरी कंपनीविरुद्ध आयकर विभागाच्या छाप्यात जप्त केलेली रोकड पाच दिवसांच्या मोजणीनंतर 351 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
टॅग्स :Dhiraj Sahu I-T Raidधीरज साहू आयकर छापाcongressकाँग्रेसMONEYपैसा