Conjoined twins veena and vani telangana passed class x board exam result
पोरी लय हूशार! जोडलेल्या डोक्यासह वेगवेगळे पेपर लिहले अन् जुळ्यांनी दहावीची परिक्षा केली पास By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:46 PM1 / 10प्रतिकुल परिस्थितीवर मात करत अभ्यास करून यशाचे शिखर गाठलेल्या मुलांची अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उदाहराबाबत सांगणार आहोत. तेलंगणा राज्यातील दोन मुली डोकं चिकटलेल्या अवस्थेत जन्माला आल्या. 2 / 10या जुळ्या मुलींनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत दहावीची परिक्षा दिली. फक्त परिक्षा दिली नाही तर या परिक्षेत या जुळ्या मुली उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अशा अवस्थेत ही कामगिरी करणं मोठा म्हणजे विजय मिळवण्याप्रमाणेच आहे. 3 / 10या दोन्ही मुलींचे नाव वीणा आणि वाणी असे आहे. 4 / 10या दोन्ही मुलींचे डोके जन्मापासूनच एकमेकांना जोडलेले आहे. या दोघी conjoined twins म्हणून जन्माला आल्या. 5 / 10पालकांनी देशभरातील वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवल्यानंतरही या दोघींची डोकी वेगळी होऊ शकली नाहीत.१० कोटी रुपये खर्च करून शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला होता. 6 / 10पण मेंदूतल्या सुक्ष्म पेशी आणि रक्तवाहिन्या गुंतल्यामुळे ही शस्रक्रिया जीवघेणी ठरण्याची शक्यता होती. 7 / 10शेवटी त्यांच्या आई वडिलांना आहे तसं दोघींना स्वीकारलं. दोघींची शरीरं वेगळी आहेत. डोकं जोडलेलं असलं तरीही मेंदू वेगवेगळे आहेत.8 / 10तेलंगणा बोर्डाचा निकाल नुकताच लागला आहे. 9 / 10त्यात GPA 10 पैकी 9.3 points मिळवून वीणा उत्तीर्ण झाली तर वाणीला 9.2 ग्रेड पॉइंड मिळाले आहे. या दोघींच्या विजयामुळे संपूर्ण कुंटुबात आनंदाचे वातावरण आहे. 10 / 10त्यात GPA 10 पैकी 9.3 points मिळवून वीणा उत्तीर्ण झाली तर वाणीला 9.2 ग्रेड पॉइंड मिळाले आहे. या दोघींच्या विजयामुळे संपूर्ण कुंटुबात आनंदाचे वातावरण आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications