शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:09 PM

1 / 9
नवी दिल्ली : भारतात कोरोना (Coronavirus) संसर्गाची प्रकरणे पुन्हा वेगाने वाढत आहेत. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, दोन आठवड्यांत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 3.5 पट वाढ झाली आहे. बहुतेक प्रकरणे अशा राज्यांमधून येत आहेत, जिथे आधीच जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
2 / 9
दिल्लीतील चार जिल्ह्यांमध्ये, केरळ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि गुजरातमधील एका जिल्ह्यात सर्वाधिक साप्ताहिक चाचणी सकारात्मकता दर (Weekly Test Positivity Rate-TPR) नोंदवला गेला आहे.
3 / 9
केंद्राच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 10 टक्के किंवा त्याहून अधिक साप्ताहिक टीपीआर असलेल्या जिल्ह्यांची संख्या 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 32 झाली आहे. एका रिपोर्टनुसार, 19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 63 जिल्ह्यांमध्ये 19-25 मार्चच्या आठवड्यात टीपीआर 5 ते 10 टक्के आढळून आले.
4 / 9
केवळ दोन आठवड्यांपूर्वी ही आकडेवारी 8 राज्यांतील केवळ 15 जिल्ह्यांमध्ये आढळून आली होती. सर्वाधिक साप्ताहिक टीपीआर नोंदवणाऱ्या क्षेत्रांमध्ये दिल्लीचा समावेश होतो. दक्षिण दिल्लीचा चाचणी सकारात्मकता दर 13.8 टक्के, पूर्व दिल्ली 13.1 टक्के, उत्तर-पूर्व दिल्ली 12.3 टक्के आणि मध्य दिल्ली 10.4 टक्के टीपीआर होता.
5 / 9
तसेच, देशातील इतर राज्यातील जिल्ह्यांमध्ये केरळमधील वायनाड (14.8 टक्के) आणि कोट्टायम (10.5 टक्के), गुजरातमधील अहमदाबाद (10.7 टक्के) आणि महाराष्ट्रात सांगली (14.6 टक्के) आणि पुणे (11.1 टक्के) यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा टीपीआर 3 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात केवळ 0.54 टक्क्यांवरून 24 मार्च रोजी 4.58 टक्क्यांवर पोहोचला आहे.
6 / 9
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी उच्चस्तरीय बैठक झाली. त्यांनी लोकांना नेहमीच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. विशेषत: कमकुवत आरोग्य असलेल्या लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस लागू करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.
7 / 9
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य सुविधांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, पीएसए प्लांट, व्हेंटिलेटर, लॉजिस्टिक्स आणि मानव संसाधनांसह रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांची परिचालन तयारी सुनिश्चित करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचा सल्ला दिला.
8 / 9
याचबरोबर, राज्यांनाही पुरेशी बेड व्यवस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. राज्यांना आजार आणि लसीकरणाबद्दल समुदाय जागरूकता वाढवण्यास आणि कोविड इंडिया पोर्टलमध्ये नियमितपणे कोरोना डेटा अपडेट करण्यास सांगितले आहे.
9 / 9
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 1,805 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहेत. सक्रिय प्रकरणाने 134 दिवसांनंतर 10,000 चा टप्पा ओलांडला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य