शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 6:14 PM

1 / 15
दक्षिण कोरिया, चीनमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्याचवेळी मध्य आशियाई देश इस्रायलमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत, ज्यांच्यामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्याचं स्पष्ट झाल्याचं सांगितलं जात आहे.
2 / 15
बुधवारी इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवासी कोरोनाबाधित सापडले असून, त्यांच्यात ओमायक्रॉन व्हेरियएंट बीए. 1 आणि त्याचा सबव्हेरियंट बीए. 2 असा एक व्हेरिएंट आढळून आला आहे, असं सांगितलं.
3 / 15
या व्हेरिएंटचं नाव आणि लक्षणांच्या संबंधी अधिकृत अशी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलमध्ये ज्या दोन रुग्णांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे, त्यांच्यात ताप, डोकेदुखी आणि मांसपेशींमध्ये वेदना आदी लक्षणे दिसून आली.
4 / 15
इस्रायलच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, या व्हेरिएंटसंबंधी अभ्यास करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक नॅचमॅन एश यांच्या म्हणण्यानुसार, या व्हेरिएंटचा प्रादूर्भाव केवळ इस्रायलमध्येच झाला असावा. तसेच दोन्ही प्रवासी विमानात बसण्यापूर्वीच संसर्गबाधित असू शकतात, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली.
5 / 15
ओमायक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो झपाट्याने पसरला, परंतु रुग्णाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. नवीन प्रकाराबद्दल अजून जास्त माहिती नाही, पण तो ओमायक्रॉनमधूनच बाहेर आला आहे.
6 / 15
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण तो चाचणीमध्ये कमी उपलब्ध आहे. याशिवाय, जगभरातील घट होणाऱ्या केसेसबद्दल चाचणी कमी झाली आहे आणि त्यामुळे कमी केसेस दिसत आहेत असं म्हटलं आहे.
7 / 15
नवीन व्हेरिएंट श्वसनसंस्थेच्या फक्त वरच्या भागावर परिणाम करतो. म्हणजे तो फुफ्फुसापर्यंत पोहोचत नाही आणि घशापर्यंतच मर्यादित राहते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टिल्थ व्हेरिएंट्सचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये चक्कर येणे, अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणे दिसतात.
8 / 15
व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणे दिसतात. याशिवाय ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे आणि हृदयाचे ठोके जलद होणे ही त्याची लक्षणे आहेत.
9 / 15
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओमायक्रॉन व्हायरसमुळे कोरोनाची नवीन लाट येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण पूर्व युरोपमध्ये आढळून आलेले आहेत. त्यामुळेच अर्मेनिया, अरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, युक्रेन आणि रशियात करोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.
10 / 15
हाँगकाँग, दक्षिण कोरिया या देशांमध्येही कोरोना रुग्ण वाढलेले दिसून येतात. दुसरीकडे, जूनपर्यंत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे, असे आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 15
जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कमी चाचण्या आणि अनेक आठवडे संसर्ग कमी होऊनही कोरोना प्रकरणांमध्ये जागतिक वाढ होण्याचा धोक्याचा इशारा दिला आहे.
12 / 15
शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, WHO ने वाढत्या केसेसवर चिंता व्यक्त केली आहे. आशियातील काही भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचं आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचं आवाहन केलं आहे.
13 / 15
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, की कोरोनाच्या चाचण्या कमी असूनही जागतिक स्तरावर रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या उद्रेकात वाढ होईल, असं अपेक्षित आहे.
14 / 15
डब्ल्यूएचओच्या कोविड-19 टेक्निकल प्रमुख मारिया वेन केरखोव यांच्या मते, गेल्या आठवड्यात 11 मिलियनपेक्षा अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
15 / 15
रुग्णसंख्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही वाढ अशा भागात होण्याची शक्यता जास्त आहे, ज्या भागात कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले गेले आहेत, असं ते म्हणाले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन