corona infection increased due to crowd in market and wedding season says dr guleria
CoronaVirus News : अलर्ट! गर्दीच्या ठिकाणी जाताय तर असू शकतो कोरोनाचा धोका; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 6:57 PM1 / 14देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 85 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा 86,83,917 पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,28,121 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 47,905 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 550 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वेग मंदावतानाचे चित्र आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.3 / 14कोरोनाच्या संकटात दिलासादायक माहिती समोर येत आहे. भारताचा रिकव्हरी रेट वाढला असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर लाखो लोकांनी कोरोनावर मात केली आहे.4 / 14सणासुदीच्या काळात जास्त काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कोरोनाचा धोका वाढू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लोकांनी कोरोना काळात नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.5 / 14मास्क, क्वारंटाईन, होम आयसोलेशन आणि सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून देशात खबरदारीचे उपाय केले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी सध्या खूप गर्दी पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. 6 / 14सण-समारंभाचे दिवस असल्याने बाजारपेठेत गर्दीही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'एम्स' रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्यासोबत गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.7 / 14बाजारपेठा आणि लग्न समारंभातून कोरोना वेगाने पसरत असल्याचं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. 8 / 14गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने मास्क लावला नसेल आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तो एकाच वेळेस अनेक लोकांना कोरोना संक्रमित करू शकतो असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.9 / 14कोरोना संक्रमित व्यक्ती जिथे जातील तो संपूर्ण भाग आणि त्यांच्या नातेवाईकांना संक्रमणाचा धोका कायम असणार आहे. असे लोक कोरोनाचे 'सुपर स्प्रेडर' म्हणून काम करतात.10 / 14'सुपर स्प्रेडर'ची संख्या सध्या दिल्लीत जास्त असू शकते, अशी शक्यताही डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. कारण दिल्लीत लोक घराच्या बाहेर पडून बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. तसेच सण-समारंभातही सहभागी होत आहेत. 11 / 14सुपर स्प्रेडिंग इव्हेंटमुळे कोरोना संक्रमणाच्या रुग्णांत वाढ झाल्याचं दिसून येत असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे. सणासुदीच्या दिवसांत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांमुळे बाजारात गर्दी होत आहे.12 / 14गर्दीच्या ठिकाणी सावधानता बाळगण्याची आणि जितकं शक्य असेल तितकं या गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं असल्याचं रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. 13 / 14आपली सुरक्षितता आपल्याला सुनिश्चित करायची आहेत. तापमानातील बदल आणि वायू प्रदूषणामुळे अधिक सतर्क होण्याची सध्याची आवश्यकता आहे. 14 / 14सण-समारंभातील गर्दी लक्षात घेता अशा उत्सवांपासून दूर राहण्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल असा सल्लाही त्यांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications