corona irdai permits life insurers to issue policies electronically
विमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 4:11 PM1 / 8कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि सामान्य व्यवसायातील समस्या लक्षात घेता विमा नियमन करणारी संस्था 'आयआरडीए'ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे.2 / 8आयआरडीएने जीवन विमा कंपन्यांना विमा पॉलिसी अर्थात ई-पॉलिसी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त दिली आहे. 3 / 8आयआरडीएने सांगितले की, सध्या 2020-21 दरम्यान जारी केलेल्या सर्व विमा पॉलिसींना ही परवानगी असेल.4 / 8विविध विमा कंपन्यांना ग्राहकांपर्यंत पॉलिसी पाठविण्यात अडचणी येत असल्याची चिंता व्यक्त केली होती. यानंतर आयआरडीएने हा निर्णय घेतला आहे. 5 / 8यासंदर्भात विमा कंपन्यांनी कोरोना व्हायरसचा हवाला दिला आहे. त्याला आयआरडीएनेही सहमती दर्शविली आहे.6 / 8आयआरडीएने असेही म्हटले आहे की, विमा कंपन्यांना ई-पॉलिसी पाहण्यासाठी आणि समजण्यासाठी ग्राहकांना 30 दिवसांचा कालावधी द्यावा लागेल. 7 / 8ई-पॉलिसी घेण्याबाबत ग्राहकांकडून संमती घ्यावी लागेल. जर ग्राहक अद्याप हार्ड कॉपी किंवा कागदपत्रांची मागणी करत असतील तर कंपन्यांनी ती पाठवावी लागेल.8 / 8दरम्यान, नियामकाने जीवन विमा कंपन्यांना त्यांचे गुंतवणूक परतावा प्रत्येक तिमाहीमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्याची परवानगी दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications