Corona Positive AAP MLA visits Hathras victim's family, files case in UP
कोरोना पॉझिटीव्ह आमदाराची हाथरसच्या पीडित कुटुंबाला भेट, गुन्हा दाखल By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 1:32 PM1 / 11उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने देश हादरला आहे. त्यानंतर, देशातील अनेक राजकीय पक्षांनी हाथरसला भेट दिली. 2 / 11हाथसरधील पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी, स्थानिक नेत्यांपासून ते काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, राहुल गांधींनीही हाथरसला भेट दिली. 3 / 11आम आदमी पक्षाचे नेते व आमदार खासदारही हाथरसच्या पीडित कुुंबीयांना भेटायला आले होते. 4 / 11खासदार संजय सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी हाथरसला भेट दिली, त्यावेळी त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. 5 / 11तर, आमदार कुलदीप कुमार यांनीही ५ ऑक्टोबर रोजी हाथरसला भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले.6 / 11कुलदीप कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने योगी सरकारवर टीका करत, पीडित मुलीसाठी आवाज उठवला आहे. 7 / 11बंदुकीच्या धाकाने आणि पोलिसांच्या बळाचा वापर करुन पीडित कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप आमदार कुमार यांनी केला आहे. 8 / 11आमदार कुमार यांनी ५ ऑक्टोबर रोजी पीडित कुटुंबाला भेट दिली, मात्र २९ सप्टेंबर रोजी त्यांनी स्वत:च आपण कोरोना पॉझिटीव्ही असल्याचे सांगितले आहे. 9 / 11कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे १४ दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचं असतानाही कुमार यांनी पीडित कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापनाचा भंग त्यांनी केला आहे. 10 / 11याप्रकरणी आमदार कुमार यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 11 / 11लोकप्रतिनीधी, आमदार असतानाही कोरोना परिस्थितीचं गांभीर्य न बाळगता कुलदीप कुमार यांनी पीडित कुटुंबीयांस भेट दिली. तसेच, इतरही कार्यकर्त्यांमध्ये ते वावरल्याचे दिसून येते आणखी वाचा Subscribe to Notifications