corona second wave child infected karnataka delhi death
तिसऱ्या लाटेआधीच मुलांवर कोरोनाचा कहर! कर्नाटकातील मुलांची आकडेवारी चिंताजनक By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 3:28 PM1 / 8कर्नाटकात कोरोनाची तिसरी लाट येण्याआधीच मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटकात कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वाधिक जास्त रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेदरम्यानच कर्नाटकात मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, तर तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.2 / 8कोरोनाच्या पहिल्या लाटेत 9 मार्च ते 25 सप्टेंबर 2020 या काळात 10 वर्षांपेक्षा लहान 19,378 मुलांना आणि 11 ते 20 वर्षे वयोगटातील 41,985 मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला होता. कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्व रेकॉर्ड मोडताना दिसत आहेत. फक्त 15 दिवस म्हणजेच 1 ते 16 मे 2021 दरम्यान आतापर्यंत 19 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.3 / 8डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये कोरोनाची विचित्र लक्षणे दिसून येत आहेत. ज्यामध्ये जवळपास 10 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये गॅस्ट्रोएंटेरायटिसचा सुद्धा समावेश आहेत. काही प्रकरणांमध्ये त्वचेचे रोग मुलांमध्ये आढळून येत आहेत. कर्नाटकातील मुलांमध्ये वाढत्या संसर्गाबाबत सरकार सतर्क झाले आहे. तसेच, लोकांचीही चिंता वाढली आहे. दुसर्या लाटेमध्येच मुलांवर कोरोनाचा कहर सुरू झाला आहे.4 / 8दिल्लीत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही दिल्लीत संक्रमणामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे 5 वर्षांची एक परी आणि 9 वर्षीय क्रिशुचा मृत्यू झाला. या दोन्ही मुलांवर दिल्लीतील जीटीबी (गुरु तेग बहादूर) रुग्णालयात उपचार सुरू होते. 5 वर्षांची परी संसर्ग झाल्यानंतर सहा दिवस व्हेंटिलेटरवर होती. गेल्या बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.5 / 8याचबरोबर, 9 वर्षीय क्रिशुचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, बुधवारी क्रिशुची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. जीटीबी रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही मुलांच्या ऑक्सिजनची पातळी 30 च्या खाली गेली होती आणि लँग्समध्ये इन्फेक्शन खूप जास्त होते.6 / 8मुलं संक्रमित झाल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, येणाऱ्या काळात मुलांचे कोरोनापासून संरक्षण झाले पाहिजे. मुलांसाठी उपचाराच्या सुविधा, लसीसाठी प्रोटोकॉल इत्यादी ठरविले पाहिजेत. तसेच, भारताच्या भवितव्यासाठी सध्याच्या मोदी सिस्टमला झोपेच्या जागे करण्याची गरज आहे, असे म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.7 / 8आरोग्य तज्ञांच्या मते, बहुतेक मुले कोरोनापासून ग्रस्त आहेत.ज्यामध्ये सौम्य ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, थकवा, घसा खवखवणे, अतिसार, स्नायूंचा अशा लक्षणांचा समावेश आहे. तर पोट आणि आतड्यांसंबंधी समस्या काही मुलांमध्ये तसेच काही असामान्य लक्षणे देखील दिसून आली आहे.8 / 8संशोधनानुसार, मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम नावाचा नवीन सिंड्रोम देखील मुलांमध्ये दिसून आला आहे. मुलांमध्ये सतत ताप, उलट्या होणे, पोटात दुखणे, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा येणे, धडधडणे, डोळ्यांना लालसरपणा, ओठांवर सूज येणे, हात पाय दुखणे, डोकेदुखी आणि शरिराच्या कोणत्याही भाग गाठी तयार होणे इत्यादीसारख्या मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोमची सामान्य लक्षणे आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications