Corona Vaccination: cdc reports more heart inflammation cases post vaccine
Corona Vaccination : लस घेतल्यानंतर तरुणांमध्ये हृदयासंबंधी आजार, चिंता वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:31 AM1 / 9कोरोनाविरोधात लसीकरण मोहीम जगभरात वेगाने चालवली जात आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम सामान्य आहेत, परंतु CDC मध्ये तरुणांमध्ये काही इतर लक्षणे आढळली आहेत. 2 / 9अमेरिकेच्या CDC च्या अहवालानुसार बऱ्याच तरुणांकडून लस घेतल्यानंतर हृदयात सूज येणे आणि जळजळ होत असल्याची तक्रारी येत आहेत.3 / 9व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या टीम ब्रीफिंग दरम्यान CDCचे संचालक रोशेल वालेंस्की म्हणाले की, कोरोना लसीकरणानंतर 300 हून अधिक तरुणांमध्ये हार्ट इन्फ्लेमेशन झाल्याचा रिपोर्ट मिळाला आहे. 4 / 9लसीकरणाच्या तुलनेत अशी प्रकरणे कमी असली तरी तरूणांच्या मते ही प्रकरणे अपेक्षेपेक्षा जास्त नोंदवली जात आहेत.दरम्यान, लस आणि हार्ट इन्फ्लेमेशन यासंबंधी लवकरच चर्चा करण्यात येईल, असे सल्लागार समितीने सांगितले. 5 / 9 मात्र, समितीने आपल्या कोरोना लसीकरण मोहिमेतील कोणतेही बदल फेटाळून लावले आहेत. तसेच, लसीनंतर मायोकार्डिटिस म्हणजेच हृदय कमकुवत होण्यासंबंधी वाढत्या प्रकरणांबद्दल समिती चिंतित आहे.6 / 9CDCने मेच्या अखेरीस कोरोना लसीनंतर मायोकार्डिटिसच्या काही घटनांवर लक्ष ठेवले होते. रिपोर्टमध्ये पुरुषांपेक्षा मायोकार्डिटिसचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आढळले आहे. फायझर आणि मॉडर्ना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ही प्रकरणे अधिक दिसून येत आहेत.7 / 9एनबीसी न्यूजच्या म्हणण्यानुसार, लसीनंतर हृदयाशी संबंधित आजार, मायोकार्डिटिस किंवा पेरिकार्डिटिसची लक्षणे दिसणार्या लोकांचे अहवाल CDCने डॉक्टरांकडून मागविले आहेत.8 / 9मायोकार्डिटिस आणि पेरिकार्डिटिसच्या लक्षणांमध्ये ताप, थकवा, छातीत दुखणे आणि श्वास लागणे यांचा समावेश आहे. लस घेतल्यानंतर आतापर्यंत जेवढी प्रकरणे समोर आली आहे, त्यामध्ये जास्तकरून गंभीर प्रकरणे नाहीत.9 / 9कोरोना रिस्पॉन्स टीम ब्रीफिंग दरम्यान वालेंस्की म्हणाले, 'लस घेतल्यानंतर अशा परिस्थितीत बहुतेक लोक योग्य काळजी आणि विश्रांती घेऊन पूर्णपणे बरे होत आहेत. लस आणि हृदयाशी संबंधित या प्रकरणांवर सल्लागार समितीच्या चर्चेत आम्हाला बर्याच महत्वाच्या माहिती मिळू शकतात. यामुळे आमच्या सुरक्षतेच्या प्रयत्नांना आणखी मजबूत करेल.' आणखी वाचा Subscribe to Notifications