शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: पुन्हा यू-टर्न! मोदी सरकारनं अवघ्या महिन्याभरात शब्द फिरवला; लसीकरण मोहीम संकटात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 9:53 AM

1 / 9
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेला डेल्टा व्हेरिएंट म्युटेट झाला आहे.
2 / 9
कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण अभियानाला गती देण्याची आवश्यकता असताना मोदी सरकारनं अचानक यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
3 / 9
मे महिन्यात देशात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती. त्यावेळी देशात लसींचा तुटवडा होता. ३१ डिसेंबरपर्यंत देशाला २१६ कोटींहून अधिक डोस मिळतील असा दावा त्यावेळी सरकारकडून करण्यात आला होता.
4 / 9
आता मात्र मोदी सरकारनं स्वत:चा शब्द फिरवला आहे. डिसेंबरपर्यंत देशाला १३५ कोटी डोस मिळतील अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात सरकारनं शपथपत्रातून दिली आहे. याचा अर्थ केंद्रानं या वर्षाच्या अखेरपर्यंत मिळणाऱ्या डोसची संख्या ८१ कोटींनी कमी केली आहे.
5 / 9
ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान ८ लसींचे २१६ कोटींहून अधिक डोस मिळतील अशी आशा असल्याचं १३ मे रोजी मोदी सरकारनं सांगितलं होतं. वर्षाच्या अखेरपर्यंत संपूर्ण लोकसंख्येला लस मिळेल, असंदेखील सांगण्यात आलं होतं.
6 / 9
आता मात्र सरकारनं लसींच्या डोसच्या संख्येवरून मोठा यू-टर्न घेतला आहे. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान १३५ कोटी डोस मिळण्याची शक्यता असल्याचं आता सरकारनं म्हटलं आहे. आधी ८ लसी उपलब्ध होणाऱ्या सरकारनं यावरुनही घूमजाव करत ५ लसी मिळतील असं सांगितलं आहे.
7 / 9
कोविशील्ड, कोवॅक्सिन, बायोलॉजिकल ई, झायडस कॅडिला, नोवावॅक्स, भारत बायोटेक नेझल लस, जिनोवा बायोफार्मा आणि स्पुटनिक व्ही या ८ लसींचे २१६ कोटींहून अधिक डोस मिळतील असा दावा सरकारनं १३ मे रोजी केला होता.
8 / 9
आता सरकारनं स्वत:चा शब्द फिरवला आहे. कोवॅक्सिन, कोविशील्ड, बायोलॉजिकल ई, झायडस कॅडिला, स्पुटनिक व्ही अशा ५ लसींचे १३५ कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती शपथपत्राच्या माध्यमातून सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
9 / 9
सरकारनं अवघ्या महिन्याभरात मोठा यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या लसीकरण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या