Corona Vaccination Delta Variant Of Covid 19 Can Infect Vaccinated Too Finds Icmr Study
Corona Vaccination: ...तरीही होतेय कोरोनाची लागण; कोविशील्ड, कोवॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:58 AM1 / 9देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. दररोज ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटबद्दलच्या एका संशोधनानं चिंता वाढली आहे. 2 / 9कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात आतापर्यंत ५५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जेल्टा व्हेरिएंटनं सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे.3 / 9डेल्टा व्हेरिएंट जास्त वेगानं पसरणारा असून तो लसीकरण झालेल्यांनादेखील बाधित करत असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (आयसीएमआर) चेन्नईत केलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. 4 / 9लसीकरण न झालेल्या आणि लस घेतलेल्या, अशा दोन्ही गटांना डेल्टाचा धोका आहे. मात्र लस घेतली असल्यास मृत्यूचा धोका कमी होतो, असं संशोधन सांगतं. जर्नल ऑफ इंस्पेक्शनमध्ये १७ ऑगस्टला ही माहिती प्रसिद्ध झाली. 5 / 9कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्यांमध्ये आढळून आला. जगात हाच स्ट्रेन सर्वाधिक पसरला आहे. याचमुळे भारतात दुसरी लाट आली होती.6 / 9डेल्टा व्हेरिएंटची लागण होताच कोविशील्ड आणि कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अँटिबॉडी कमी होतात, असं आयसीएमआरचं संशोधन सांगतं. 7 / 9डेल्टा व्हेरिएंट १३० हून अधिक देशांमध्ये पसरला असल्याची माहिती आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीच्या (एनआयव्ही) संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी दिली. 8 / 9आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये तयार झालेल्या अँटिबॉडीजचा अभ्यास केला. डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात त्या कितपत प्रभावी ठरतात यावर संशोधन करण्यात आलं, असं अब्राहम यांनी सांगितलं. 9 / 9डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँटिबॉडीजचा प्रभाव दोन ते तीन पटींनं कमी होतो, अशी माहिती संशोधनातून पुढे आल्याचं अब्राहम यांनी सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications