Corona Vaccination In India Need To Be Fast To Prevent Covid Third Wave Said Scientist
Coronavirus:...तर देशात ‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, वैज्ञानिकांची भविष्यवाणी; लहान मुलांसाठी धोका By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 1:26 PM1 / 10कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी लढणाऱ्या भारतात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. जर देशात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला वेग आणला नाही तर रुग्णसंख्येत वाढ होऊन तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2 / 10पुढील ६-८ महिन्यात म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. 3 / 10तिसऱ्या लाटेचा इशारा देणारे वैज्ञानिक एम विद्यासागर यांनी सांगितले की, देशात जर लसीकरण मोहिमेला वेग येणार नाही आणि कोविड १९ च्या आवश्यक नियमांचे पालन होणार नसेल तर पुढच्या ६-८ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. 4 / 10आयआयटी हैदराबाद येथील प्रोफेसर विद्यासागर यांनी म्हटलंय की, जर अँन्टिबॉडी संपल्या तर रोगासोबत लढण्याची क्षमता कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लसीकरण वाढवणं गरजेचे आहे. कोविड १९ पसरणार नाही यासाठी आखून दिलेले नियम पाळावे लागतील. 5 / 10केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्यासह अनेक वैज्ञानिकांनी देशात तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं आहे. या वैज्ञानिकांमध्ये डॉ. वी रवी यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असणार आहे असं डॉ. रवी यांनी सांगितले आहे. 6 / 10डॉ. रवी म्हणाले की, आशिया खंडातील अनेक देश याआधीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढत आहेत. अनेक पाश्चिमात्य देशात कोरोनाची चौथी लाट आली आहे. अशावेळी भारतात तिसरी लाट येणार नाही हे मानणं योग्य राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. 7 / 10याशिवाय ह्दयरोग तज्त्र डॉ. देवी शेट्टी यांनी एका लेखात म्हटलंय की, कोरोना व्हायरस जास्तीत जास्त लोकांना त्याच्या जाळ्यात ओढत आहे. प्रत्येकवेळी तो स्वत:चं रूप बदलून येत आहे. पहिल्या लाटेत मुख्यत: वृद्ध लोकांना याचा धोका होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत युवकांवर परिणाम झाला आहे. तर तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असणार आहे 8 / 10सध्या देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे; परंतु मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ५२९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. विशेष असे की, दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. बुधवारी ३,८४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.9 / 10देशात कोरोना लसींचा अत्यावश्यक साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण अभियानावर त्याचा परिणाम झाला आहे. आतापर्यंत १८ कोटी ५८ लाख ९ हजार ३०२ डोस लावण्यात आले आहेत. मंगळवारी केवळ १३ लाख १२ हजार १५५ डोस लावण्यात आले. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी तपासण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे10 / 10गेल्या २४ तासांमध्ये भारताचा कोरोना मृत्यूदर १.११% नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसातच जवळपास ८ हजार ८५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज ५ हजारांवर रुग्णांचा मृत्यू होईल असे तज्ज्ञांकडून भाकीत वर्तवण्यात आले होते. ते खरे ठरण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications