धक्कादायक! कोरोना लसीकरणावेळी गोंधळ, एक हजाराहून अधिक लोकांचा एकच मोबाइल नंबर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 17:03 IST
1 / 9कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या कोरोना लसीकरणाची सुरुवात झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.2 / 9मात्र, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एक अशी घटना घडली, ज्यामुळे लोकांच्या मनात कोरोना लसीकरण मोहिमेबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. 3 / 9ग्वाल्हेरमध्ये महापालिकेच्या 1087 कर्मचार्यांना कोरोनाची लस द्यायची होती. मात्र, एकाही कर्मचाऱ्याला लस देण्यात आली नाही. कारण, या सर्व कर्मचार्यांच्या नावासमोर एकच मोबाईल नंबर लिहिला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.4 / 9हा नंबर पालिकेचे अधीक्षक राजेश सक्सेना यांच्या कार्यालयाचा होता आणि या नंबरवरून सर्व कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते. ज्या कर्मचाऱ्यांना लस द्यायची होती, त्यापैकी एकाही कर्मचाऱ्याजवळ मेसेज गेला नव्हता.5 / 9दरम्यान, ग्वाल्हेरमध्ये विविध ठिकाणी 13 लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत, परंतु बर्याच ठिकाणी आरोग्य कर्मचारी लसची वाट पहात राहिले. 6 / 9दुसरीकडे, जयारोग्य हॉस्पिटल ग्रुपमधील सात लसीकरण केंद्रात एकही फ्रंटलाइन वर्कर कोरोनाची लस घेण्यासाठी पोहोचला नाही. यावरून आरोग्य विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.7 / 9सोमवारी (8 फेब्रुवारी) 5382 लोकांना लस द्यायची होती. मात्र, केवळ 1592 लोकांना लस देण्यात आली. सर्वात गंभीर दुर्लक्ष पालिका कर्मचार्यांच्या बाबतीत दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.8 / 9पालिका कर्मचार्यांचे प्रकरण जेव्हा उघडकीस आले, तेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यानंतर सर्व कर्मचार्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 9 / 9जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि पालिका सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाबद्दल जागरूक केले गेले जेणेकरून त्यांचे सर्व गैरसमज दूर होतील.