corona vaccine becomes expensive after six months know latest rate of covishield and covaxin
Corona Vaccine: चिंतेत भर! आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 8:55 AM1 / 12देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत. 2 / 12एकीकडे कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनदरवाढ, महागाई यांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भर म्हणून आता कोरोना लसींच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. (covishield and covaxin)3 / 12कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतासह जागतिक स्तरावरील सर्वच देश लसीकरणावर सर्वाधिक भर देत आहेत. भारतात तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. (Corona Vaccinatioin)4 / 12देशात आताच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड (covishield), भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (covaxin) आणि रशियाची स्फुटनिक व्ही या लसी नागरिकांना दिल्या जात आहे. तर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. 5 / 12देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सहा महिने उलटून गेले आहेत आणि लस उत्पादक कंपन्यांकडून लसींच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन केल्यानंतर लसींच्या किमतीत घट होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, याउलट झाले आहे. (Corona Vaccine)6 / 12जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी लसींचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यात वाढ झालेली दिसते. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रम २०० आणि २०६ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. 7 / 12सरकारसाठी असलेल्या या दरात आता वाढ करण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे २०५ आणि २१५ रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ कोव्हिशिल्ड लसीच्या १० डोस असलेल्या एक शीशी मागे सरकारला ५० रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.8 / 12तर कोव्हॅक्सिन लसीच्या २० डोस असलेल्या एका शीशी मागे सरकारला १८० रुपये जास्त मोजावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. आता नवीन किमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 9 / 12यानुसार, १६ जुलै २०२१ रोजी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटकडे कोव्हिशिल्ड लसीच्या ३७.५ कोटी डोसची, तर भारत बायोटेककडे कोव्हॅक्सिनच्या २८.५ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. विशेष बाब म्हणजे स्वदेशी लस निर्माता असलेल्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची लस कोव्हिशिल्डपेक्षा महाग मिळत आहे. 10 / 12तसेच भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे उत्पादनही मंदगतीने करत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारसह खासगी लसीकरण केंद्रांनाही कोव्हॅक्सिनची लस महाग दरात मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 11 / 12भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची लस आयसीएमआरच्या मदतीने तयार करण्यात आली असून, याच्या एकूण नफ्याच्या पाच टक्के रक्कम आयसीएमआरला दिली जाणार आहे. भारत बायोटेककडून नफ्याची ही रक्कम वर्षातून दोनवेळी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 12 / 12देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ४४.१९ कोटी लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली गेली आहे. मुलांसाठी कोरोना लस येत्या ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications