Corona Vaccine how many people died due to side effects after taking both doses of corona vaccine
Corona Vaccine : कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावर साईड इफेक्टने किती जणांचा मृत्यू झाला?; सरकारनं सांगितला आकडा By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 4:46 PM1 / 12जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने 40 कोटींचा टप्पा केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.2 / 12भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. 3 / 12देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 4 / 12गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.5 / 12देश कोरोना संकटाचा सामना करत असून कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टची देखील चर्चा रंगली होती. 6 / 12कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्समुळे झालेल्या मृतांचा आकडा आता समोर आला आहे. अँटी-कोविड-19 लसीचा (corona vaccines) दुसरा डोस घेतल्यानंतर विपरित परिणामांच्या घटनांमध्ये 167 लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 / 12केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. अशी सर्वाधिक 43 प्रकरणे केरळमध्ये झाल्याची माहिती भारती पवार यांनी सभागृहात दिली. 8 / 12यानंतर महाराष्ट्रात 15, पश्चिम बंगालमध्ये 14 आणि मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 12 मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.9 / 12दुसर्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, गेल्या 3 फेब्रुवारीपर्यंत स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांची 13 प्रकरणे नोंदवली गेली आणि ती सौम्य लक्षणे होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 12आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 804 जणांचा मृत्यू झाला. 11 / 12कोरोनाच्या संकटात पाच राज्यांनी चिंता वाढवली असून तेथील परिस्थिती ही गंभीर आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थानचा समावेश आहे. नव्या रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत.12 / 12देशाचा रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications