कोरोना लस! भारताच्या जोरदार हालचाली; ५ कंपन्यांकडून मागविले कोटेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 12:32 IST
1 / 10एकीकडे रशिया, चीनने कोरोना व्हॅक्सिन (Covid-19 vaccine) बनविल्याचा दावा केला आहे. रशियाने तर लसीचे उत्पादनही केले आहे. यावर भारतानेही मोठ्या हालचाली सुरु केल्या असून देशातीलच पाच कंपन्यांना पुढील तीन दिवसांत कोटेशन देण्याचे आदेश दिले आहेत. 2 / 10भारतात तीन कंपन्या कोरोना लसीवर चाचण्या करत असल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला दिली होती. या तीन आणि अन्य दोन कंपन्यांकडून केंद्र सरकारने कोटेशन मागविले आहे. 3 / 10पहिल्या तीन कंपन्यांच्या कोरोना लसीची चाचमी अंतिम टप्प्यात आहे. तर अन्य दोन कंपन्यांची चाचणी सुरु आहे. या कंपन्य़ांना सरकारे तीन दिवसांत रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे. 4 / 10जर या कंपन्यांच्या लसीला मंजुरी मिळाली तर ती लस किती कमी वेळात आणि कोणत्या किंमतीत तयार केली जाऊ शकते, याची माहिती मागविली आहे.5 / 10अमेरिका, ब्रिटेन, युरोपियन युनियनसारखा भारताने अद्याप कोणत्याही कंपनीशी किंवा देशाशी करार केलेला नाहीय. मात्र, कोरोनाचे संकट पाहता लवकरात लवकर लस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 6 / 10कोरोना लसीसाठी तयार केलेल्या समितीने देशातील दिग्गज फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांसोबत सोमवारी बैठक घेतली. यामध्ये या पाच कंपन्य़ांना पुढील आदेश देण्यात आले आहेत. 7 / 10केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, वैज्ञानिक कोरोना लस बनविण्यावर काम करत आहेत. दुसरीकडे आम्ही तयार झालेली लस मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कारण भारतीयांना ही लस मिळू शकेल. समिती या कंपन्यांसोबत उत्पादन, किंमत आणि वितरणावर चर्चा करत आहे. 8 / 10रशियाने तयार केलेली लस वादात असली तरीही मॉस्कोमधील भारतीय दुतावासाचे अधिकारी रशियन आरोग्य विभागाच्या संपर्कात आहेत. गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने Sputnik V लस बनविली आहे. त्यांच्याशी संपर्कात भारतीय अधिकारी आहेत. 9 / 10गेल्या आठवड्यातच रशियाच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, जगभरातून या लसीवर संशय व्यक्त होऊ लागल्याने भारतीय अधिकारी या लसीच्या चाचणीची माहिती उपलब्ध होईपर्यंत वाट पाहत आहेत. 10 / 10दुसरीकडे सीरम इन्स्टीट्यूट ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझिनेका कंपनीने बनविलेल्या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा सुरु करणार आहे. या लसीचे नाव 'कोविशील्ड' असे ठेवण्यात आले असून देशातील 10 केंद्रांवर दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली जाणार आहे.