Corona Vaccine: pfizer india company sought permission from the Center for emergency vaccination
Coronavirus Vaccine: सिरम नाही! 'या' कंपनीने केंद्राकडे मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 9:26 AM1 / 11रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना लसीच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. याचबरोबर भारतीयांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. औषध निर्माता कंपनी फायझरने भारत सरकारकडे कंपनीने विकसित केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. 2 / 11भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय़) कडे pfizer india ने रितसर अर्ज केला आहे. महत्वाचे म्हणजे या लसीला ब्रिटन आणि बहारीनने आपत्कालीन लसीकरणाची मंजुरी दिली आहे. 3 / 11अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने दिलेल्या अर्जात देशात कोरोना लसीची आयात आणि वितरण संबंधी मंजुरी मागितली आहे. 4 / 11याशिवाय औषधे व क्लिनिकल ट्रायल नियम, २०१९ नुसार विशेष बाब म्हणून भारतीयांवर क्लिनिकल ट्रायलची सूट दिली जावी, अशीही मागणी केली आहे. 5 / 11फायझर इंडियाने भारतात लसीकरणासाठी ४ डिसेंबरला डीसीजीआय़कडे अर्ज दिला आहे. ब्रिटनने बुधवारी फायझरच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. यानंतर फायझरला परवानगी देणारा बहारीन हा दुसरा देश बनला होता. 6 / 11बहारीनने शुक्रवारी फायझरला परवानगी दिली. फायझरने जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत मिळून ही लस विकसित केली आहे. या कंपनीने अमेरिकेतही आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. 7 / 11रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शनिवारी कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. ज्या लोकांना कोरोनाचे संक्रमन होण्याचा धोका जास्त आहे त्यांना ही लस टोचली जात आहे. यासाठी रशिया त्यांच्याच देशात विकसित केलेली 'स्पूतनिक वी' ही लस वापरत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी तीन दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणाचे आदेश दिले होते. 8 / 11कोव्हॅक्सिन कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. 9 / 11कोरोना व्हायरसवर 90 टक्के परिणामकारक लस बनविल्याची अमेरिकेच्या Pfizer ने केला होता. तसेच ही लस लवकरच लाँचही करण्याची घोषणा कंपनीने केली होती.10 / 11ही कोरोना लस घेतलेले स्वयंसेवक ही लस टोचल्यानंतर कसे वाटले याचे धक्कादायक खुलासे करू लागले आहेत. काही व्हॉलंटिअरनी सांगितले की, ही लस टोचल्यानंतर हँगओव्हर सारखे वाटत होते.11 / 11डोके दुखी, ताप आणि स्नायूंचे, मांसपेशींचे दुखणे सुरु झाले होते. जसे की फ्ल्यूच्या लसीमध्ये जाणवते. लसीचा दुसरा टप्पा तर त्याहून गंभीर होता, असेही या स्वयंसेवकांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications