Corona Vaccine: Pune Pharmaceauticals company developed mRNA vaccine for corona omicron variant
Corona Vaccination: आनंदाची बातमी! ‘Omicron’वर येतेय पहिली स्वदेशी लस; पुण्यात होणार निर्मिती By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:54 PM1 / 10कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगात कोविड रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली. कोविडच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट कमी घातक असला तरी संक्रमणाच्या बाबतीत तो सगळ्यात धोकादायक असल्याचं मानलं जातं. 2 / 10जागतिक आरोग्य संघटनेनेही ओमायक्रॉनला कंन्सर्ट ऑफ व्हेरिएंटमध्ये समाविष्ट केले. ओमायक्रॉनमुळे कोरोना संक्रमणाचा दर वाढला. लसीकरणामुळे नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा ओमायक्रॉनमुळे त्याला वेग मिळाला. 3 / 10आता कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटवर लवकरच स्वदेशी लस(Corona Vaccine on Omicron) येणार आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे ही लस निर्मिती करण्यात येत आहे. ओमायक्रॉनवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही लस प्रभावी ठरेल अशी आशा आहे.4 / 10डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगात कहर माजवला आहे. डेल्टापेक्षा वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पुण्यातील एका फार्मास्यूटिकल कंपनीनं ही लस तयार केली आहे. जीनोवा बायोफार्मास्यूटिकल असं या कंपनीचं नाव आहे.5 / 10या कंपनीच्या संशोधनात ही लस तिसऱ्या टप्प्यात पोहचली आहे. या कंपनीने लसीला एमआरएनए लस(mRNA Vaccine for Omicron) ची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकं लक्षात ठेवता स्वदेशी लसीच्या रिसर्चचा दुसऱ्या टप्प्यातील डेटा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.6 / 10आता या कंपनीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून मान्यतेची गरज आहे. ही संस्था लवकरच कंपनीद्वारे करण्यात आलेल्या फॉर्म्युल्यावर आढावा घेऊन मान्यता देईल अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.7 / 10SARS Cov2 व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटला ध्यानात ठेवत mRNA व्हॅक्सिन विकसित केली गेली. दुसऱ्या टप्प्यातील या लसीच्या चाचणीसाठी या लसीचे दोन डोस ३ हजार लोकांना दिले गेले. आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे.8 / 10कंपनीने सध्या या लसीच्या उत्पादनावर भर दिला आहे. एकदा केंद्र सरकारच्या DCGI ची परवानगी मिळाली तर मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. मात्र सध्या वेगाने उत्पादन केले जात नाही कारण लसीचा साठा झाल्यास तो खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्यता मिळण्याची वाट पाहिली जात आहे.9 / 10दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेवर भारतात भर दिला जात आहे. २०२२ च्या सुरुवातीलाच १५-१८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार, १५-१८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन दिली जात आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जातो. 10 / 10कोविन पोर्टलनुसार, १५-१८ वयोगटातील ३ कोटी ४५ लाख ३५ हजाराहून जास्त मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ज्या वेगाने ही लसीकरण मोहिम हाती घेतलंय ते पाहता फेब्रुवारी अखेरपर्यंत या वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर १२ ते १५ वयोगटातील मुलांचं लसीकरण केले जाऊ शकते अशी माहिती आरोग्य मंत्रालय आणि NTAGI सूत्रांनी दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications