Corona Vaccine : आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा! दुसरा डोस घेणाऱ्या महिलेला Covaxin ऐवजी दिला Covishield चा डोस अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:24 AM1 / 10देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,08,74,376 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,08,764 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.2 / 10देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,154 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 724 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 3 / 10देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे, याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. 4 / 10झारखंडची राजधानी रांचीमध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार या घटनेवरुन उघड झाला आहे. एका महिलेला कोरोना (Corona Vaccination) लसीचा पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता. 5 / 10जेव्हा ही महिला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गेली असता तिला कोवॅक्सिन (covaxin) ऐवजी कोविशिल्डचा (Covshield) डोस दिला गेला. यानंतर महिलेची प्रकृती बिघडली आहे. 6 / 10मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना रांचीच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बरियातू रोड (Bariatu Road) येथे घडली आहे.7 / 10रांचीमधील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या शीला देवी या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रांचीच्या बरियातू रोड येथील एडवान्स डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेल्या. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला कोवॅक्सिनऐवजी कोविशिल्डची लस दिली गेली. 8 / 10कोविशिल्डची लस घेतल्यानंतर लगेचच त्या महिलेची प्रकृती ढासळली आणि त्यानंतर महिलेस एडवान्स डायग्नोस्टिक सेंटरने रांचीच्या मेडिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.9 / 10महिलेचा मुलगा चंदन याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 'कोरोनाची लस घेतल्यानंतर आईला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली.' यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एकच गोंधळ घातला. 10 / 10कुटुंबियांनी घातलेल्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीसीआर 9 च्या पोलिसांनी महिलेच्या कुटुंबियांना शांत करत परिस्थिती हाताळली. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications