शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona vaccine : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह कोरोनावरील विविध लसींचे असे आहेत साइड इफेक्ट आणि परिणाम

By बाळकृष्ण परब | Published: January 14, 2021 5:08 PM

1 / 10
२०२१ या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतासह जगभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असली तरी कोरोनाची लस आणि त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. आज आपण जाणून घेऊयात कोरोनावरील विविध लसींचे डोस घेतल्यानंतर दिसलेल्या संभाव्य साइड इफेक्ट विषयी
2 / 10
कुठलीही लस घेतल्यानंतर त्वचा लाल होणे, लस घेतलेल्या जागी सूज आणि काही वेळ इंजेक्शनच्या वेदना होणे ही सामान्य बाब आहे. काही लोकांनी लस घेतल्यानंतर पहिल्या तीन दिवसांमध्ये थकवा, ताप आणि डोकेदुखी होत असल्याचे सांगितले आहे. मात्र अशी लक्षणे दिसण्याचा अर्थ हा ही लस आपले काम करत असून, शरीरामध्ये आजाराशी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार होत असल्याचे ते लक्षण आहे.
3 / 10
आतापर्यंत ज्या ज्या लसींना मान्यता मिळाली आहे. परीक्षणांमध्ये त्या लसींमध्ये फार मोठे साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. युरोपमधील युरोपियन मेडिसिन्स एजन्सी, अमेरिकेमधील फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी या लसींना मान्यता दिली आहे. यापूर्वी एक दोन घटनांमध्ये लोकांना व्हॅक्सिनमधून अॅलर्जी झाल्याचे दिसून आले होते. मात्र चाचणीमध्ये भाग घेणाऱ्या अन्य लोकांमध्ये असे दिसून आलेले नाही.
4 / 10
जर्मनी आणि अमेरिकेने मिळून विकसित केलेली बायोएनटेक फायझरची कोरोनावरील लस ही इतर लसींपेक्षा वेगळी आहे. या लसीमध्ये एमआरएनए चा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच यामध्ये विषाणू नाही तर केवळ त्याच्या जेनेटिक कोडचा वापर करण्यात आला आहे. ही लस आतापर्यंत अनेक जणांना देण्यात आली आहे. मात्र या लसीमुळे अमेरिकेत एकाला आणि ब्रिटनमध्ये दोन जणांना अॅलर्जी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ब्रिटनमध्ये ज्यांना लसीपासून अॅलर्जी असेल त्यांनी लस घेऊ नये असे आवाहन करण्यात आले होते.
5 / 10
अमेरिकेतील कंपनी असलेल्या मॉडर्नाची कोरोनावरील लस हीसुद्धा फायझरच्या लसीशी मिळतीजुळती आहे. ही लस घेणाऱ्या सुमारे दहा टक्के लोकांना थकवा जाणवला. तर काही लोक असेसुद्धा होते. ज्यांच्या चेहऱ्यावरील नसा काही वेळासाठी पॅरलाइझ झाल्या. मात्र असे का झाले हे अद्याप कळू शकले नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीने याबाबत दिले आहे.
6 / 10
ब्रिटन आणि स्वीडनमधील कंपनी असलेल्या अॅस्ट्राजेनेकाच्या लसीचे परीक्षण सप्टेंबरपर्यंत थांबवावे लागले होते. कारण या लसीमुळे एका स्वयंसेवकाच्या कण्याच्या हाडामध्ये सूज आल्याचा दावा करण्यात आला होता. त्याची तपासणी करण्यासाठी बाहेरील तज्ज्ञही बोलावण्यात आले होते. मात्र ही सूज लसीमुळेच आली असेल, असं खात्रीलायकरीत्या सांगता येणार नाही, असे या तज्ज्ञांनी सांगितले. इतर लसींप्रमाणे या लसीमुळेही अधिक वयाच्या लोकांमध्ये ताप, थकवा यासारथी लक्षणे कमी प्रमाणात दिसून आली.
7 / 10
रशियन लस असलेल्या स्पूटनिक व्हीला ऑगस्ट महिन्यामध्ये मान्यता मिळाली होती. कुठलीही लस ही तीन टप्प्यातील परीक्षणानंतर बाजारात येते. मात्र स्पूटनिक व्ही लसीला दोन टप्प्यातील चाचणीनंतर मान्यता देण्यात आली. रशियातील ही लस भारतातसुद्धा देण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते या लसीचा डाटा पूर्णपणे सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे याच्या साइड इफेक्ट्सबाबत स्पष्टपणे काही सांगता येणार नाही.
8 / 10
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनसुद्धा स्पूटनिकप्रमाणेच वादात सापडलेली आहे. सरकारने या लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली आहे. मात्र या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निष्कर्षांची माहिती मिळालेली नाही. तसेच ही लस कितपत उपयुक्त आहे. याचीही माहिती मिळालेली नाही.
9 / 10
सर्वसाधारणपणे जन्माला येताच मुलांना लसी देण्यास सुरुवात होते. मात्र कोरोनाच्या लसीबाबत असे होणार नाही. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मुलांवर याचे परीक्षण करण्यात आलेले नाही, तसेच परवानगी नाही. दुसरी बाब म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीपासूनच मुलांवर या साथीचा प्रभाव नगण्य प्रमाणात पडला आहे. त्यामुळे मुलांना ही लस दिली जाणार नाही.
10 / 10
कोरोनाच्या विविध लसींपासून असलेल्या साइड इफेक्टचा डेटा अद्याप पूर्णपणे मिळालेला नाही. जो डेटा मिळाला आहे. तो केवळ काही आठवड्यांचा आहे. अद्याप त्याच्या दीर्घकालीन परिणामांबाबत काही समजलेले नाही. दुसरीकडे प्रत्येक लसीपासून काही धोके नेहमीच राहिलेले आहेत. जर्मनीतील उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता २० टक्के असेल आणि ५० हजार लोकांमध्ये एका व्यक्तीला साइड इफेक्टची शक्यता असेल, तर अशी लस जोखीम उचलण्यास योग्य असते.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य