शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona vaccine : म्हणून भारताच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या मान्यतेबाबत उपस्थित झालंय प्रश्नचिन्ह, हे आहे कारण

By बाळकृष्ण परब | Published: January 04, 2021 2:00 PM

1 / 10
२०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनाच्या संसर्गाच्या सावटाखाली संपल्यानंतर आता २०२१ च्या सुरुवातीला भारतामध्ये कोरोना विषाणूविरोधातील दोन लसींना मान्यता मिळाली आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोविशिल्ड या लसीनंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलाही मान्याता मिळाली आहे. मात्र संपूर्ण स्वदेशी लस असलेल्या कोव्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर या लसीच्या मान्यतेच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
2 / 10
कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी संयुक्तरीत्या विकसित केली आहे. या लसीमुळे भारत हा कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
3 / 10
मात्र कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे लसीबाबतची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झाली नसताना कोव्हॅक्सिन या लसीला कशी काय मान्यता देण्यात आली. असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
4 / 10
दरम्यान, भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी रॉयटर्सशी बोलताना कोव्हॅक्सिनबाबत सांगितले की, ही लस संपूर्ण जगभरातील लोकांना उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य आहे. ज्यांना लसीची खूप गरज आहे त्यांच्यासाठी कोव्हॅक्सिन बऱ्यापैकी रोगप्रतिकारशक्ती विकसित करते आणि ही सुरक्षितही आहे, असे कृष्णा एल्ला यांनी सांगितले.
5 / 10
कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत ८०० स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात आला होता. तर तिसऱ्या टप्प्यात २३ हजार स्वयंसेवकांची भरती करण्यात आली होती. ही चाचणी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली होती, असे भारत बायोटेकने सांगितले. मात्र या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या लसीला फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या लसीला ३ बऱ्याच आधी ३ जानेवारी रोजीच मान्यता मिळाली.
6 / 10
भारत बायोटेक कंपनी आणि सेंट्र्ल ड्ग्स स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून लसीच्या प्रभावाबाबत कुठल्याही प्रकारचे परिणाम प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. आकडेवारीशिवाय लसीला मान्यता मिळाल्याने कोव्हॅक्सिनच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
7 / 10
या लसीबाबत साकेत गोखले यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणत्या आधारावर या लसीला मान्यता दिली गेली आहे, असा सवाल विचारला आहे. तसेच माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीच्या सुरक्षिततेबाबत आणि अन्य माहितीबाबतची माहिती मागवली आहे.
8 / 10
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनीही कोव्हॅक्सिनला मिळालेल्या मान्यतेबाबत प्रश्न विचारला आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही सवाल उपस्थित केला आहे.
9 / 10
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लसीवरून विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच लसीला मान्यता देण्यापूर्वी कठोर प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले असे सांगितले.
10 / 10
तर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सिनचा वापर बॅकअपच्या रूपात केला जाईल, असे सांगितले. अचानक बाधितांची संख्या वाढल्यास आपल्याल लसीची गरज भासेल. तेव्हा भारत बायोटेकच्या लसीचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य