शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: ...तर लसीकरणामुळेच वाढेल कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा मोदी सरकारला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 3:21 PM

1 / 9
देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याची गरज आहे.
2 / 9
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाख नव्या रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या खाली आला आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी लसीकरण अभियानाबद्दल गंभीर इशारा दिला आहे.
3 / 9
अंदाधुंद, अपूर्ण लसीकरणामुळे कोरोना विषाणूचे नवे स्ट्रेन तयार होतील. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढेल, असं असा धोक्याचा इशारा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सरकारला देण्यात आला आहे.
4 / 9
कोरोनावर मात केलेल्यांना लसीची आवश्यकता नाही, अशी महत्त्वाची सूचना तज्ज्ञांनी केली आहे. यात कोविड १९ टास्क फोर्समध्ये कार्यरत असलेल्या एम्सच्या डॉक्टरांचादेखील समावेश आहे.
5 / 9
तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवला आहे. सर्वच वयोगटांसाठी एकाचवेळी लसीकरण सुरू ठेवल्यास संसाधनं संपतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
6 / 9
एकाचवेळी सगळ्यांचं लसीकरण करण्याऐवजी आकडेवारीचा अभ्यास करून लसीकरणाची रणनीती ठरवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लसीकरणासाठी आकडेवारीचा अभ्यास करून प्राधान्यक्रम निश्चित व्हायला हवा, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.
7 / 9
मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान राबवण्याऐवजी आरोग्याच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या, धोका असलेल्या व्यक्तींनाच लस दिली जावी, असं तज्ज्ञांनी त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमोलॉजिस्ट्स आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रीव्हेंटि्ह एँड सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे.
8 / 9
लहान मुलांना आणि वयस्कर असलेल्या, मात्र वय जास्त नसलेल्या व्यक्तींना कोरोना लस दिली जाऊ नये. ते परवडणारं नाही, असं तज्ज्ञांनी अहवालात नमूद केलं आहे.
9 / 9
लस ही कोरोनाविरुद्धचं अतिशय मजबूत आणि शक्तिशाली हत्यार आहे. मात्र इतर सगळ्याच शस्त्रांप्रमाणे तिचा वापर अंदाधुंदपणे केला जाऊ नये. तो काळजीपूर्वक करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या