corona vaccine will reach to delhi on 28th december
Corona Vaccine: देशात कधी येणार कोरोनाची पहिली लस?; तारीख ठरली By कुणाल गवाणकर | Published: December 22, 2020 3:37 PM1 / 10देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटींच्या पुढे गेला आहे. दिवाळीनंतर दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.2 / 10काल दिवसभरात देशात २० हजारपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होताना दिसत आहे.3 / 10कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही लसीची गरज आहे. ही लस देशाला कधी मिळणार याचं उत्तर मिळालं आहे.4 / 10२८ डिसेंबरला दिल्लीत कोरोना लसीची पहिली खेप देशात येईल. त्यामुळे जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू होऊ शकतं. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वीच याबद्दलची माहिती दिली होती.5 / 10२८ डिसेंबरला कोरोना लसीची पहिली खेप भारतात येईल अशी माहिती दिल्ली विमानतळाचे सीईओ विदेह कुमार जयपुरिया यांनी दिली. 6 / 10सध्या देशात काही लसी संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहेत. यात कोविशील्ड लस सर्वात आघाडीवर आहे.7 / 10लसीकरणास विलंब होऊ नये म्हणून केंद्रानं चार महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. राज्य. जिल्हा, ब्लॉक पातळीवर टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. 8 / 10आतापर्यंत २६० जिल्ह्यांमधील २० हजारहून अधिक जणांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्याच आलं आहे.9 / 10केंद्रानं को-विन नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्या माध्यमातून कोरोना लसींच्या वितरणाचं रिअल टाईम मॉनिटरिंग करण्यात येईल. को-विनचं मोबाईल ऍपदेखील तयार करण्यात आलं आहे.10 / 10को-विनच्या माध्यमातून कोरोना लसीचं लोकेशन आणि तिचं तापमान यांची माहिती मिळेल. संभाव्य लाभार्थ्याला लसीचा दुसरा डोज मिळून सर्टिफिकेट मिळेपर्यंत को-विनच्या मॉनिटरिंग केलं जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications