शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...

By बाळकृष्ण परब | Published: December 01, 2020 3:36 PM

1 / 6
भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही काळापासून नियंत्रणात असला तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतातही कोरोनावरील लसींची चाचणी सुरू आहे.
2 / 6
दरम्यान, दिल्लीतील एम्स येथे कोव्हॅक्सिनच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला डोस घेतल्यानंतर या रुग्णालयातील चिफ न्युरोसायन्स असलेल्या डॉ. एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव यांनी या लसीच्या सुरक्षिततेबाबत मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
3 / 6
भारताने आता स्वस्त लस विकसित करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे, असे डॉ. एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
4 / 6
डॉ. श्रीवास्तव यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, मी गेल्या गुरुवारी दिल्लीतील एम्समध्ये कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. आता पुढचा डोस हा २८ दिवसांनंतर दिला जाईल.
5 / 6
५५ वर्षीय डॉक्टर श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोनावरील लस घेतल्यानंतर आतापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा अपाय दिसून आलेला नाही. दरम्यान, हल्लीच चाचणीमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाने आपल्याला अपाय झाल्याचा दावा केला होता.
6 / 6
कोव्हॅक्सिनच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात एक हजारांहून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी करण्याचा एम्सचा विचार आहे. सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत ४० ते ५० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. त्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरmedicinesऔषधंHealthआरोग्य