शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 'या' गोष्टीमुळे पुन्हा पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 2:41 PM

1 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,37,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 16
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,88,884 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा रुग्णांचा आकडा देखील 10,050 वर पोहोचला आहे.
3 / 16
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.
4 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 21,13,365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 / 16
जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लगेगच पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
6 / 16
जर एखाद्याला एकदा कोरोना झाला असेल तर त्याला पुन्हा संसर्ग होण्यास वेळ लागतो असं म्हटलं जातं. बाधितांच्या शरीरात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि त्या त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतात. पण आता वेगळी माहिती समोर आली आहे.
7 / 16
कोरोना झाल्यानंतर कोरोना होऊ शकतो. जगभरातील सर्व देशांमध्ये जवळपास लाखो लोकांना याची लागण झाली आहे आणि अजूनही होत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, परंतु त्यानंतर लगेचच पुन्हा कोरोना होऊ शकतो. कसं ते जाणून घेऊया...
8 / 16
पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचे कारण स्पष्ट करताना, एम्सचे लसीकरण प्रभारी डॉ. संजय रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनच्या आधी कोरोना हा पुन्हा होण्याचा धोका खूप कमी होता. पण आता तसं नाही.
9 / 16
2020 मध्ये जेव्हा भारतातही लोकांना कोरोनाची लागण होऊ लागली. तेव्हा धारावीसारख्या अनेक भागात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. पण आता तिथेही बातम्या येत नाहीत.
10 / 16
कारण कोरोनाचे आतापर्यंतचे सर्व प्रकार अतिशय धोकादायक होते, जे एकदा झाले की त्याच्याशी दीर्घकाळ लढण्याची प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होते. पण ओमायक्रॉन सामान्य सर्दी फ्लू सारखा आहे.
11 / 16
बहुतेक प्रकरणांमध्ये, अशा परिस्थितीत ते शरीरात अँटीबॉडीज तयार करू शकत नाही, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा कोरोना होऊ शकतो. संजय राय यांनी सांगितले की मानवी शरीरात नैसर्गिक इंजेक्शन म्हणजेच कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी स्वतःची प्रतिकारशक्ती उत्तम काम करते.
12 / 16
कोरोना लसीपेक्षा 2700 पटीने जास्त रोगप्रतिकारकशक्ती ही नैसर्गिक असते. तुमच्या शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ही तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकते. लस शरीरात अँटीबॉडीज तयार करतात.
13 / 16
ह्युमरल इम्युनिटी, ही इम्युनिटी तुमच्या शरीरातील अँटीबॉडीज शोधते आणि दुसरी सेल्युलर इम्युनिटी आहे, ज्यामध्ये इम्युनिटी मेमरी बनवते. तुमच्या शरीरातील अँटीबॉडीज संपले तरी ही रोगप्रतिकारशक्ती व्हायरसशी लढण्यास मदत करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 16
देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दहा हजारांवर पोहोचली आहे.
15 / 16
महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. तर कोरोनाचा वेग वाढला असून देशातील पाच राज्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.
16 / 16
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 48,270 रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर कर्नाटकात 48,049 रुग्ण, केरळमध्ये 41,668, तामिळनाडूमध्ये 29,870, गुजरातमध्ये 21,225 रुग्ण सापडले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसHealth Tipsहेल्थ टिप्स