शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Good News: भारतात लॉकडाऊनची गरज नाही; कोरोनावर सर्वात अचूक भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:32 AM

1 / 7
कोरोनाने चीनमध्ये हाहाकार माजविला आहे. चीन मृत्यूंचा आकडा लपवित असला तरी कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमींबाहेर रांगा लागल्या आहेत. तर हॉस्पिटलमध्ये जिथे मिळेल त्या जागेवर प्रसंगी लादीवर माणसे झोपविण्यात आली आहेत. त्यांच्यावर तशाच परिस्थितीत उपचार सुरु आहेत. असे असताना भारतातही या कोरोनाच्या लाटेमुळे हायलेव्हल बैठकांना सुरुवात झाली आहे.
2 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महत्वाची बैठक घेणार आहेत. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आरोग्य मंत्री, सचिवांसोबत बैठक बोलावली आहे. गर्दी करू नये, मास्क वापरण्यास सांगण्यात आले आहे. असे असताना देशातील कोरोना काळात सर्वात अचूक अंदाज लावणाऱ्या आयआयटी कानपूरने मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे.
3 / 7
चीनमधील कोरोनावरून भारतीयांनी घाबरू नये. आयआयटीचे प्रोफेसर मणींद्र अग्रवाल यांनी सांगितले की, भारतातील ९८ टक्के लोकसंख्येमध्ये कोरोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकार क्षमता तयार झाली आहे. जर काही लोकांची ही प्रतिकार क्षमता कमी झालेली असेल तर छोटी-मोठी लाट येऊ शकते.
4 / 7
याव्यतिरिक्त भारताला चिंतेची कोणताही बाब नाहीय. सध्या भारतीयाना कोणत्याची बुस्टर डोसची गरज नाहीय. तसेच नवीन वर्षाच्या पार्ट्या आणि लग्न सोहळ्यांवरही बंधणे आणण्याची गरज नाहीय. कोरोना लस कमी काळासाठी सुरक्षा देते, भारतीयांना त्याचीही गरज नाहीय, असे ते म्हणाले.
5 / 7
गणितीय मॉडेलच्या आधारे प्रोफेसर अग्रवाल म्हणाले की, ऑक्टोबर अखेर चीनमधील केवळ ५ टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती. नोव्हेंबरमध्ये त्यात 20 टक्क्यांची वाढ झाली. चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून ही महामारी झपाट्याने पसरली. चीनमध्ये कोरोनाच्या 500 प्रकरणांपैकी फक्त एक प्रकरण सार्वजनिक केले जातेय. त्यामुळे चीनमधून रोज येणारी नवीन प्रकरणे खूप कमी दिसतात.
6 / 7
चीनची 30 टक्के लोकसंख्या अजूनही व्हायरसपासून दुर आहे. याचा अर्थ, पुढे धोका आहे. ओमायक्रॉनचा नवा व्हेरिअंट या सर्व लोकांपर्यंत पोहोचेल. चीनच्या 90 टक्के लोकसंख्येला याची बाधा होईल. सेरो-सर्वेक्षणाद्वारे कोरोनाचा प्रसार मोजला जातो. परंतू चीनमध्ये असे कोणतेही सर्वे केलेले नाहीएत. ओमायक्रॉन लसीचे कवच भेदत आहे. चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी हटविल्यानंतर कोरोनाचा प्रकोप होणार हे गृहीतच धरले जात होते.
7 / 7
जगातील ज्या देशांच्या नागरिकांनी कोरोनाविरूद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्राप्त केली आहे त्यांना धोका नाही. ब्राझीलमधील प्रकरणांमध्ये वाढ ही ओमिक्रॉनच्या अधिक संसर्गजन्य विषाणूच्या प्रसारामुळे झाली आहे. तेथे लोकसंख्येचा काही भागाने रोग प्रतिकारशक्ती गमावली आहे. दक्षिण कोरियातील 25%, जपानमधील 40% आणि अमेरिकेतील 20% लोक नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्राप्त करू शकले नाहीत. यामुळे जपानला कोरोनाचा मोठा धोका आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKanpur IITकानपूर आयआयटी