शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोना रिटर्न्स! "हवेत पसरले ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट"; सरकारच्या सर्व्हेमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:31 PM

1 / 10
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांत वेगाने कोरोनाचा प्रसार होत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाने पुन्हा धडकी भरवली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 10
भारतात कोरोना व्हायरस आणि त्याच्या व्हेरिएंटबाबत एक मोठा अभ्यास समोर आला आहे. सरकारला कोरोनाच्या निरीक्षणात असे आढळून आले की ओमायक्रॉनचे सब-व्हेरिएंट BA.2 आणि XBB ते BQ.1 सह इतर सर्व सब व्हेरिएंट हे हवेत पसरत आहेत.
3 / 10
कोरोनाचं संकट असताना दिलासादायक बाब समोर आली आहे. या व्हेरिएंटच्या उपस्थितीमुळे कोरोना प्रकरणांमध्ये किंवा कोविड मृत्यू दरात कोणतीही वाढ झालेली नाही. हा अहवाल देशभरातील सर्व 324 पॉझिटिव्ह केसेसवर आधारित आहे, जे इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (IDSP) अंतर्गत जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.
4 / 10
देशभरात या लॅब आणि रुग्णालये आहेत, जिथे कोरोना प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तयारी केली जाते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सर्व 324 पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन प्रकाराची पुष्टी झाली आहे.
5 / 10
मंत्रालयाने म्हटले आहे की ज्या भागात ही प्रकरणे नोंदवली गेली आहेत तेथे कोविड संसर्ग दर किंवा मृत्यू दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षी 24 डिसेंबरपासून देशभरातील अनेक विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची अचानक कोरोना चाचणी केली.
6 / 10
मंत्रालयाने सांगितले की, तेव्हापासून 13.6 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवासी विविध विमानतळांवर 7786 फ्लाईटने भारतात पोहोचले. त्यापैकी 29,113 प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
7 / 10
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'विमानतळावरील कोरोना चाचणीनंतर एकूण 183 पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या, ज्यांना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. यापैकी 50 नमुन्यांच्या अनुक्रमाने ओमायक्रॉन आणि ओमायक्रॉन सब लाइनेज दिसून आले. यापैकी काही रीकॉम्बिनंट्स देखील समाविष्ट आहेत.
8 / 10
प्रवाशांपैकी 11 मध्ये XBB व्हेरिएंट, 12 मध्ये BQ.1.1 आणि 1 प्रवाशांमध्ये BF7.4.1 सब व्हेरिएंट आढळले. INSACOG चे उपाध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले की ते नियमितपणे सांडपाण्याचे नमुने तपासत आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये कोणत्याही प्रकारात वाढ झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत.
9 / 10
मी लोकांना सल्ला देईन की ओमायक्रॉनचे नवीन सब व्हेरिएंट आढळल्यास घाबरण्याची गरज नाही, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने मास्क लावण्याचा सल्ला देण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 10
चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहता, भारत देखील अलर्ट मोडमध्ये आला आहे आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. देशातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात चीनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही कमी आहे. देशाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना केला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत