corona virus vaccine reaches varanasi today carelessness surfaces during its transportation
मोदींच्या मतदारसंघात लस नेताना जे घडलं ते पाहून डोक्यावर हात माराल! By कुणाल गवाणकर | Published: January 13, 2021 8:58 PM1 / 10देशात पुढील काही दिवसांत कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पुण्यात तयार करण्यात आलेली कोविशील्ड देशभरात पाठवण्यात आली.2 / 10सीरमनं देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना लस पाठवली आहे. कोरोनाची लसीची वाहतूक करताना, तिची साठवणूक करत असताना विशिष्ट तापमान राखणं गरजेचं असतं.3 / 10कोरोना लसीची वाहतूक करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत धक्कादायक प्रकार घडला.4 / 10पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आज दुपारी कोरोना लसीची पहिली बॅच पोहोचली. ही बॅच विस्तारा एअरलाईन्सच्या माध्यमातून वाराणसीत आणली गेली.5 / 10विस्तारा एअरलाईन्सनं कोरोना लसीचे १६ खोके वाराणसीत पोहोचले. यामध्ये १४ जिल्ह्यांसाठी १ लाख ८५ हजार डोस आहेत. मात्र कोरोना लसी पोहोचवत असताना मोठा हलगर्जीपणा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.6 / 10कोरोना लसीची वाहतूक करणाऱ्या वाहनाचं फिटनेस २००६ मध्येच संपलं असल्याची माहिती आरटीओच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.7 / 10UP ६५ AG ००२१ क्रमांक असलेलं वाहन साडे सोळा वर्षे जुनं आहे. त्याच्या फिटनेसची वैधता १२ मे २००६ पर्यंत होती. त्यामुळे फिटनेसची वैधता आता जवळपास साडे पंधरा वर्षे उलटली आहेत. 8 / 10कोरोना लसींची वाहतूक करणारी वाहनं सुस्थितीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोना लसी विशिष्ट तापमानात ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्यांची वाहतूक करणारी वाहनं खराब झाल्यास त्याचा थेट परिणाम लसीवर होऊ शकतो.9 / 10कोरोना लसी कमीतकमी वेळेत आरोग्य केंद्रात पोहोचणं आवश्यक असतं. त्यामुळे कोरोना लसींच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनं चांगल्या स्थितीत असायला हवीत.10 / 10याआधी गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन देशात पार पडलं. त्यावेळीही वाराणसीत लसीच्या वाहतुकीदरम्यान निष्काळजीपणा दिसून आला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications